Join us  

निक्कीला संपूर्ण आठवडाभर मिळाली भांडी घासण्याची शिक्षा, जान्हवी म्हणाली- "आता मुद्दाम आपण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 9:50 AM

रितेश देशमुखने काल निक्कीला दोन मोठ्या शिक्षा सुनावल्या. या शिक्षा ऐकताच जान्हवीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये या आठवड्यात गणेशोत्सव विशेष भाऊचा धक्का पाहायला मिळतोय. यावेळी रितेशभाऊंचा अँग्री यंग मॅन अवतार सदस्यांना पाहायला मिळाला. भाऊच्या धक्क्याला सुरुवातीलाच रितेश देशमुखने निक्कीची शाळा घेतली. निक्कीने आठवडाभरात घरात जी दादागिरी केली त्याविषयी रितेशभाऊंनी निक्कीचा खरपूस समाचार घेतला. याशिवाय तिला दोन शिक्षाही सुनावल्या.

निक्कीला मिळाल्या दोन शिक्षा

निक्की तांबोळीला काल रितेशभाऊंनी भाऊच्या धक्क्याच्या सुरुवातीलाच दोन शिक्षा सुनावल्या. यापैकी एक म्हणजे, निक्कीला संपूर्ण सीझनभर कॅप्टनसी मिळणार नाही. हे ऐकताच निक्कीने डोक्याला हात मारला. तर दुसरी शिक्षा देताना रितेश म्हणाले, "तुम्हाला घरातील ड्यूटी करायला प्रॉब्लेम येतो ना. दुसरी शिक्षा हीच आहे की हा संपूर्ण आठवडा तुम्ही घरातील सर्व भांडी घासणार आहात. तुम्हाला कोणी मदत केली तर बिग बॉसला सांगून त्या व्यक्तीला थेट नॉमिनेट करेन. तुम्ही जर भांडी घासायला नकार दिला तर तुम्हालाही मी थेट नॉमिनेट करेन." अशाप्रकारे निक्कीच्या दादागिरीवर रितेशभाऊंनी शिक्षा देऊन तोडगा काढला.

निक्कीला शिक्षा सुनावताच जान्हवी काय म्हणाली?

पहिले तीन आठवडे निक्कीची जिगरी मैत्रीण असणारी जान्हवी गेल्या दोन आठवड्यांपासून निक्कीच्या विरोधात गेलीय. रितेशभाऊंनी निक्कीला शिक्षा सुनावताच जान्हवी आर्याला म्हणाली की, "परफेक्ट शिक्षा मिळालीय. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिला भांडी घासायला द्यायची. भांडी करायची हा मुद्दामून. भांडी करुन करुन तिला घासायला द्यायची." अशाप्रकारे निक्कीला दोन मोठ्या शिक्षा मिळाल्या. 

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखकलर्स मराठी