Join us  

Video: रितेशचं तुफान एनर्जीत ढोलवादन अन् बरंच काही; असा शूट झाला 'बिग बॉस मराठी ५' चा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 5:43 PM

'बिग बॉस मराठी ५' चा प्रोमो सर्वांनी पाहिला. पण हा प्रोमो शूट कसा झाला त्यासाठी बातमीवर क्लिक करुन पाहा खास व्हिडीओ (bigg boss marathi 5)

'बिग बॉस मराठी ५' ची उत्सुकता शिगेला आहे. मागील चार सीझनचं होस्टिंग महेश मांजरेकर यांनी केलं. यंदाच्या 'बिग बॉस मराठी ५'चं होस्टिंग रितेश देशमुख करत आहे. रितेश 'बिग बॉस मराठी ५' चं होस्टिंग कसं करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच 'बिग बॉस मराठी ५' चा काहीच दिवसांपूर्वी नवीन प्रोमो रिलीज  झालेला. या प्रोमोत 'बिग बॉस मराठी ५' ची तारीख उघड झाली.  रितेश देशमुखच्या उपस्थितीत हा प्रोमो शूट खास पद्धतीने शूट झाला.

'बिग बॉस मराठी ५' च्या प्रोमोमागची मेहनत

'बिग बॉस मराठी ५' चा प्रोमो अवघ्या काही सेकंदांचा होता. पण हा छोटासा प्रोमो शूट करायला पडद्यामागे किती लोक होते, याचा अंदाज तुम्हाला हा प्रोमो पाहून येईल. प्रोमोत पाहायला मिळतं की शूटींगचा कॅमेरा इकडून तिकडे फिरत आहे. ढोलताशा पथकही खास वस्त्रं परिधान करुन शूटींगसाठी आलं आहे. अशातच काळ्या रंगाचे विशेष कपडे परिधान करुन रितेश देशमुखची एन्ट्री होते. रितेश तुफान एनर्जीत ढोलताशा वाजवत  त्याचं शूटींग करतं. हा प्रोमो पाहून 'बिग बॉस मराठी ५' बद्दलची उत्सुकता आणखी चाळवली गेलीय.

'बिग बॉस मराठी ५' टीव्हीवर कधीपासून

'बिग बॉस मराठी ५'  सुरु व्हायला फक्त १३ दिवस बाकी आहेत. 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येतील. शो कधी भेटीला येणार आहे हे कळलं असले तरी बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.  'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन २८ जुलैपासून दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळेल.

टॅग्स :रितेश देशमुखबिग बॉस मराठीबिग बॉस