बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला काही दिवसात सुरुवात होत आहे. या बहुप्रतिक्षित रिएलिटी शोचं होस्टिंग यावेळी आपला 'लय भारी' अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. कल्ला तर होणारच! म्हणत रितेशचा प्रोमोही हिट झाला. सलमान खान, महेश मांजरेकर आणि आता अनिल कपूर यांच्याशी त्याची तुलना केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रितेश देशमुखने त्याला स्वत:ला बिग बॉसमध्ये जायला आवडलं असतं का यावर उत्तर दिलं.
'बिग बॉस' सुरु होण्यापूर्वी रितेश देशमुखने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. 'तुला कधी बिग बॉसची ऑफर आली होती का? जर आली असती तर स्पर्धक म्हणून जायला आवडलं असतं का? असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. यावर रितेश म्हणाला, "मला स्पर्धक म्हणून बिग बॉसची ऑफर कधीच आली नाही. १०० दिवसांची ही फार मोठी कमिटमेंट आहे. म्हणजे दोन सिनेमांसाठी असते तेवढी ही कमिटमेंट आहे. हे सोपं नाहीए. जायला आवडलं असतं का तर हो, नक्कीच आवडलं असतं."
बिग बॉस मराठी ५'मध्ये मानसी नाईक, अंकिता वालावलकर, संजू राठोड, प्रणव रावराणे हे कलाकार दिसण्याची शक्यता आहे. रितेश देशमुखला 'बिग बॉस'मध्ये होस्टच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बिग बॉस' हिंदीत सलमानची वेगळीच क्रेझ आहे. 'बिग बॉस' ओटीटीमध्ये अनील कपूर यांचं होस्टिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. तर मराठी 'बिग बॉस'मध्ये महेश मांजरेकरांनी केलेल्या होस्टिंगनेही प्रेक्षकांची मन जिंकली होती. आता रितेशसमोर मोठं आव्हान असणार आहे.