Join us

लग्नानंतर ६ वर्षांनी प्रिन्स होणार बाबा! अभिनेत्याच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:21 IST

प्रिन्स लवकरच बाबा होणार आहे. त्याने स्वत:च एका मुलाखतीत याबाबत हिंट दिली आहे. 

रोडिज, स्प्लिट्सविला, बिग बॉस यांसारख्या रिएलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवलेला प्रिन्स नरूलाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. रिएलिटी शोचा स्पर्धक ते परिक्षक असा यशस्वी प्रवास प्रिन्सने केला आहे. फिटनेसमुळेही प्रिन्स चर्चेत असतो. छोट्या पडद्यावरील तो चॉकलेट बॉय आहे. पण, सध्या तो वेगळाच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रिन्स लवकरच बाबा होणार आहे. त्याने स्वत:च एका मुलाखतीत याबाबत हिंट दिली आहे. 

प्रिन्स नरुलाने नुकतीच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याला करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रश्न विचारले गेले. भारतीने प्रिन्सला बेबी प्लॅनिंगबद्दलही विचारलं. "आपका गोला कब आनेवाला है?" असा प्रश्न भारतीने प्रिन्सला विचारला. याचं उत्तर देताना तो म्हणाला, "लवकरच". प्रिन्सच्या या वक्तव्यामुळे तो खरंच बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

प्रिन्स बेबी प्लॅनिंगबद्दल सांगताना म्हणाला, "जेव्हा आमचं मुंबईत घर असेल आणि माझ्याकडे काम असेल तेव्हाच बेबी प्लॅन करायचं आम्ही ठरवलं होतं. कारण, मला धावपळ करावी लागू नये". त्यामुळे प्रिन्सची पत्नी युविका खरंच गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, प्रिन्स आणि युविकाने २०१६मध्ये लग्नगाठ बांधली होती. बिग बॉसमध्ये ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. आता लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

टॅग्स :प्रिन्स नरूलाटिव्ही कलाकार