कलर्सच्या शक्ती...अस्तित्व के एहसास की मध्ये एक रोमांचक ट्रॅक प्रेक्षकांची वाट पहात आहे, कारण शोच्या आगामी सिक्वेन्सचे चित्रीकरण सिंगापूर मध्ये केले जाणार आहे. शोच्या आताच्या एपिसोड मध्ये, सौम्या (रुबिना दिलैक) अजून एका संकटात सापडणार आहे कारण ती सांभाळत असलेली तिच्या बहिणीचे बाळ वरूण (मेहुणा) त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन जातो. एक किन्नर असल्यामुळे सौम्या बाळाला आई प्रमाणे सांभाळू शकत नसल्याचे ग्राम पंचायत घोषित करते आणि म्हणून बाळाचा ताबा वरूणला दिला जातो. सध्याच्या डायनामिक्स मध्ये तडका आणण्यासाठी शोमध्ये अबिगेल पांडे रिया म्हणून, रोहित रॉय एक प्रभावी व्यावसायिक म्हणून आणि मौली गांगुली त्याची पत्नी म्हणून येणार आहेत.
त्याच्या पात्राविषयी आणि टेलिव्हिजन वरील पुनरागमना विषयी बोलताना, रोहित रॉय म्हणाला, “या शो मध्ये मी साकारत असलेले पात्र म्हणजे एक व्यावसायिक आहे आणि तो त्याच्या बायको सह सिंगापूरमध्ये राहत आहे. निशांत आणि सौम्या सिंगापूर मध्ये एकत्र भेटतात आणि त्यातून अनेक कलाटण्या व वळणे येणार आहेत. अशा प्रकारच्या विचाराला प्रवृत्त करणाऱ्या असाधारण शोमध्ये काम करणे खूप छान वाटत आहे आणि तो निःसंशय प्रेक्षकांचा लाडका आहे. कलर्स सोबत माझा हा पहिला सहभाग आहे आणि हे पात्र मला देण्यासाठी मी या चॅनेलचा अतिशय आभारी आहे.”
मौली गांगुली म्हणाली, “मी शो मध्ये सुमन भल्लाची भूमिका करणार आहे. ती सकारात्मक आणि चांगल्या स्वभावाची स्त्री आहे. ती तिच्या पतीची चांगली बायको आहे आणि तो तिच्यावर खूप प्रेम करतो. माझ्या पात्रातून प्रेक्षकांना अनेक भावना दिसणार आहेत. या प्रकारच्या अनुकरणीय शो मध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे आणि माझी प्रेक्षकांना विनंती आहे की शोचा आगामी ट्रॅक पहा कारण तो नक्कीच मनोवेधक असणार आहे.”
अबिगेल पांडे म्हणाली, “मी रियाचे पात्र साकारत आहे, ती सिंगापूर मध्ये राहणारी एक महत्वाकांक्षी नर्तिका आहे. ती एक स्वतंत्र स्वभावाची मुलगी असून ती तिच्या पध्दतीने आयुष्य जगत आहे. सौम्या त्या शहरात आल्या नंतर ती तिची पाठराखीण बनली आहे. शक्ती...अस्तित्व के एहसास की मध्ये सहभागी झाल्याचा मला आनंद झाला आहे, ज्यातून प्रेक्षकांना हक्क आणि किन्नर समाजाच्या समावेशाची माहिती दिली जाते.” सौम्या या नव्या प्रवेशकांना कशी भेटते ते आगामी सिंगापूर ट्रॅक मध्ये पाहा.