'एमटीव्ही रोडिज', 'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी' यांसारख्या रिएलिटी शोमधून शिव ठाकरे प्रसिद्धीझोतात आला. मराठमोळ्या शिवने या रिएलिटी शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला शिव 'बिग बॉस हिंदी'च्या १६व्या पर्वाचा उपविजेता ठरला होता. त्यानंतर 'खतरों के खिलाडी'मध्येही सहभागी होत त्याने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. खतरों के खिलाडीचा होस्ट आणि बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेटेटीने शिवचं कौतुक केलं आहे.
"शिव खूप मेहनती मुलगा आहे. त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. त्यासाठी तो सातत्याने धडपडतोय. त्याला नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण करायला आवडतं. तो प्रामाणिक आणि माणसं जपणारा मुलगा आहे. समोरच्या व्यक्तीचा आदर करतो. करिअरमध्ये आणि आयुष्यात तो खूप पुढे जाईल, असा विश्वास वाटतो," असं म्हणत रोहित शेट्टीने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेचं कौतुक केलं आहे.
समीर चौघुलेंनी राजकुमार रावबरोबर केली स्क्रीन शेअर, व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मराठी अभिनेत्रीला आकारला गेला तिपट्ट टोल, नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली...
'बिग बॉस हिंदी'च्या १६व्या पर्वानंतर शिव ठाकरेच्या चाहत्या वर्गात भर पडली. सध्या तो 'खतरों के खिलाडी'च्या १३व्या पर्वातून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. शिव 'खतरों के खिलाडी'च्या यंदाच्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. शिवने 'खतरों के खिलाडी'च्या ट्रॉफीवर नाव कोरावं, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.