Join us

'खतरो के खिलाडी १५' मध्ये येणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री? टीव्ही अभिनेत्यालाही झाली विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:13 IST

Khatron Ke Khiladi 15: 'खतरो के खिलाडी'चा आता १५ वा सीझन असणार आहे. या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी मेकर्सने काहींना अप्रोच केलं आहे.

Khatron Ke Khiladi 15: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लोकप्रिय शो 'खतरो के खिलाडी'चा पुढील सीझन लवकरच येणार आहे. या नव्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान आता काही नावं हळूहळू समोर येत आहेत. एल्विश यादव ते मल्लिका शेरावत अशी अनेक नावं समोर आली आहेत. तसंच यामध्ये टीव्हीवरील एका प्रसिद्ध चेहऱ्याचाही समावेश आहे. कोणाकोणाला 'खतरो के खिलाडी'साठी विचारणा झाली आहे बघुया.

'खतरो के खिलाडी'चा आता १५ वा सीझन असणार आहे. या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी मेकर्सने काहींना अप्रोच केलं आहे.  आतापर्यंत शोमध्ये टीव्हीवरील अनेक लोकप्रिय चेहरे झळकले. त्यांनी शोमधून बक्कळ कमाईही केली. आता नव्या सीझनसाठी 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता मोहसीन खानला (Mohsin Khan) विचारणा झाल्याची चर्चा आहे. त्याने अद्याप यावर भाष्य केलेलं नाहीय. त्याला याआधी बिग बॉसचीही ऑफर होती जी त्याने नाकारली होती.

याशिवाय 'मर्डर' फेम  इमरान हाश्मीची हिरोईन मल्लिका शेरावतलाही (Mallika Sherawat) विचारणा झाली आहे. एल्विश यादव, अविनाश मिश्रा आणि तेजिंदर पाल सिंह बग्गा, गुलकी जोशी, गोरी नागोरी यांच्याही नावांची चर्चा आहे. अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र प्रेक्षकांना नव्या सीझनची कमालीची उत्सुकता आहे.

हे नाव कन्फर्म?

बिग बॉस १८ मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री ईशा सिंहचं (Eisha Singh) नाव खतरो के खिलाडी १५ साठी कन्फर्म झाल्याचं समोर येत आहे. ईशालाही शोमध्ये येण्याची उत्सुकता आहे. ईशा 'ईश्क का रंग सफेद', 'इश्क सुभानल्लाह',  आणि 'सिर्फ तुम' सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे.  

टॅग्स :खतरों के खिलाडीरोहित शेट्टीमोहसिन खानमल्लिका शेरावतबॉलिवूडटिव्ही कलाकारटेलिव्हिजन