Join us  

रोहित शेट्टी रमला लहानग्यांच्या दुनियेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 9:26 AM

डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियाची लहान मुलांची अग्रगण्य वाहिनी डिस्कव्हरी किड्‌स रोहित शेट्टी पिक्चर्झ आणि रिलायन्स अॅनिमेशनच्या सहकार्याने आपली नवीन अॅनिमेशन ...

डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियाची लहान मुलांची अग्रगण्य वाहिनी डिस्कव्हरी किड्‌स रोहित शेट्टी पिक्चर्झ आणि रिलायन्स अॅनिमेशनच्या सहकार्याने आपली नवीन अॅनिमेशन सीरीज लिटल सिंघमसह लहान मुलांच्या प्रोग्रामिंगमध्ये वेगळेपणा आणण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतातील सर्वांत यशस्वी सुपरकॉप ब्रॅन्ड आणि बॉलीवूडमधील सर्वांत मोठा ब्लॉकबस्टर सिंघमवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेल्या लिटल सिंघमचे भारतातील सर्वांत लाडकी अॅनिमेशन व्यक्तिरेखा बनण्याचे ध्येय आहे. ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी बनवण्यात आलेली लिटल सिंघम ही अॅनिमेशन सीरीज भव्य स्तरावर बनवण्यात येणार असून यात १५६ एपिसोड्‌स आणि ५ टेलि फिचर्स असतील. ही नवीन अॅनिमेशन सीरीज हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमधून प्रसारित करण्यात येणार आहे. लिटल सिंघमचे टायटल प्रायोजकत्व डाबर रेड पेस्टचे आहे.देशभरातील मुलांना प्रेरणा देण्यासाठी डिस्कव्हरी इंडियाने इंडियन कौन्सिल फॉर चाईल्ड वेल्फेअर नॅशनल ब्रेव्हरी अॅवॉर्ड्‌ससोबत भागीदारी केली आहे. ह्या सहकार्याचा एक भाग म्हणून डिस्कव्हरी  किड्‌स आयसीसीडब्लू नॅशनल ब्रेव्हरी अॅवॉर्ड (आयसीसीडब्लू एनबीए) विजेत्यांच्या जीवनातील सत्यघटनांवर आधारित खास लिटल सिंघम एपिसोड प्रसारित करतील. दोन मुले - सोनू माली (राजस्थान) आणि शिवमपेट रूचिता (हैदराबाद) यांना अनुक्रमे आयसीसीडब्लू एनबीए अॅवॉर्ड्‌स २०१६ आणि २०१५ साली मिळाले होते. हे दोघे ह्या समयी उपस्थित होते.अव्वल दिग्दर्शक, निर्माता आणि लिटल सिंगमचे मार्गदर्शक रोहित शेट्टी यांनी लिटल सिंघमच्या पत्रकार परिषदेच्या वेळेस मुंबई पोलीसदलातील काही निवडक पोलीस अधिकाऱ्यांची मुलांसोबत छान समय व्यतीत केला.“प्रत्येकच लहान मुलाच्या मनामध्ये सुपरहीरो बनण्याची इच्छा असते आणि गरज पडल्यास त्यांना दुसऱ्यांना मदत करायची असते ह्या गोष्टीवर आधारित लिटल सिंघमची संकल्पना बनवण्यात आली होती. लिटल सिंघम हा एक धैर्यशाली छोटा सुपर कॉप असून ह्या मनोरंजन अॅनिमेशन सीरीजमध्ये तो आपल्या मिर्ची नगरमधील रहिवाशांचे सर्व वाईट शक्तींपासून सुरक्षा करतो.” असे रोहित शेट्टी म्हणाले. “लिटल सिंघमच्या ह्या लाँचच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलातील काही निवडक धैर्यशाली पोलीस अधिकारी आणि आणि त्यांची मुले तसेच आयसीसीडब्लू नॅशनल ब्रेव्हरी अॅवॉर्ड विजेत्यांची उपस्थिती लाभली याचा आम्हांला मनापासून आनंद आहे. त्यांच्या धैर्याचा आम्ही सन्मान करतो आणि आशा करतो की उज्ज्वल उद्यासाठी देशभरातील सर्व मुलांना समाजासाठी अधिकाधिक चांगले करण्याची प्रेरणा मिळेल.”नवीन अॅनिमेशन सीरीज ‘बंदबुध और बुडबक’च्या सुरूवातीनंतर फेब्रुवारी २०१८ पासून आपल्या रेटिंग्समध्ये डिस्कव्हरी किड्‌सने सुमारे २०० टक्के विकास साधलेला आहे. २१ एप्रिल रोजी लिटल सिंघमच्या सुरूवातीसह डिस्कव्हरी किड्‌सच्या रेटिंगमध्ये आणखी विकास होण्याची अपेक्षा असून ते देशात नवीन इतिहास रचतील.लिटल सिंघमबद्दल डिस्कव्हरी किड्‌सचे प्रमुख श्री.उत्तम पाल सिंग म्हणाले, “भारतातील लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये सध्या सुपरहीरोंची कमतरता आहे. लिटल सिंघम हा अतिशय बोल्ड असून ही अॅनिमेशन सीरीज ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करेल. देशभरातील लहान मुलांचे लक्ष वेधण्यासाठी अॅक्शन, अॅडव्हेंचर आणि कॉमेडीचा समावेश असलेल्या ह्या मसालेदार सीरीजच्या निर्मितीसाठी आम्ही जागतिक दर्जाचे अॅनिमेशन भागीदार रिलायन्स अॅनिमेशनसोबत काम केले आहे.”