Join us

चित्रपटातील भूमिकेसाठी मला सुजयदांकडून तब्बल दोन वर्षांनंतर प्रतिसाद मिळाला- सुरवीन चावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 8:04 AM

'तीन पहेलिया' या आपल्या तीन लघुपटांद्वारे नामवंत चित्रपट दिग्दर्शक सुजय घोष हे टीव्हीवर पदार्पण करणार आहेत.आपल्या प्रेक्षकांचे वैविध्यपूर्ण मनोरंजन ...

'तीन पहेलिया' या आपल्या तीन लघुपटांद्वारे नामवंत चित्रपट दिग्दर्शक सुजय घोष हे टीव्हीवर पदार्पण करणार आहेत.आपल्या प्रेक्षकांचे वैविध्यपूर्ण मनोरंजन करण्याच्या आपल्या ध्येयानुसार ‘स्टार प्लस’ने यावेळी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक सुजय घोष यांच्याशी सहकार्याचा करार केला आहे.'गुडलक','मिर्ची मालिनी' आणि 'कॉपी' अशी या तीन लघुटांची नावे असून ‘तीन पहेलिया’ या सार्थ नावाखाली ‘स्टार प्लस’वरून ते एकापाठोपाठ एक प्रसारित केले जातील.त्यात अनेक नामवंत कलाकार भूमिका रंगविणार असून सुरवीन चावला ही त्यापैकी एक कलाकार आहे.सुजय घोष यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका रंगविण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. आता 'कॉपी' या लघुपटातील भूमिकेद्वारे सुरवीन चावलाचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.तिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले, “त्यांच्या चित्रपटात मला एखादी भूमिका रंगविण्यास देण्याची विनंती मी सुजयदांना तब्बल दोन वर्षांपूर्वी केली होती, यावर कोणाचा आता विश्वास बसणार नाही. या गोष्टीला दोन वर्षं उलटल्यामुळे मी त्यांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकारण्याची आशा सोडून दिली होती. पण एके दिवशी मला त्यांच्या कार्यालयातून फोन आला की कॉपी नावाच्या एका लघुपटातील भूमिकेची माहिती घेण्यासाठी त्यांनी मला बोलाविले आहे.माझा आनंद गगनात मावेना.त्यांनी मला ही भूमिका रंगविण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची अतिशय आभारी असून कॉपीच्या कथानकातील कलाटण्या आणि अनपेक्षित धक्क्यांनी प्रेक्षकांना थरारकतेचा अनुभव मिळेल.”यंदाच्या उन्हाळ्याच्या मोसमात ‘स्टार प्लस’ आपल्या प्रेक्षकांसाठी एक थरारक मालिका घेऊन येत आहे. आपल्या प्रेक्षकांचे वैविध्यपूर्ण मनोरंजन करण्याच्या आपल्या ध्येयानुसार ‘स्टार प्लस’ने यावेळी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध  दिग्दर्शक सुजय घोष यांच्याशी सहकार्याचा करार केला आहे.'कहानी','टीन','कहानी-2 : दुर्गा रानी सिंह' यासारख्या रहस्यपटांचे दिग्दर्शन आणि पटकथाकार म्हणून सुजय घोष ओळखले जातात. आपल्या गूढ- रहस्यमय चित्रपटांसाठी विख्यात असलेले सुजय घोष ‘स्टार प्लस’वर तीन चित्रपट सादर करणार आहेत. हे तीन लघुपट ‘तीन पहेलिया’ या सार्थ नावाखाली रविवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून ‘स्टार प्लस’वरून प्रसारित केले जातील.