‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये सुरवीन चावला साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 8:41 AM
नेहमी कोणती तरी आगळी भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरवीन चावला ही अलीकडेच ‘स्टार प्लस’वरील सुजय घोष यांच्या ‘तीन पहेलिया’ या ...
नेहमी कोणती तरी आगळी भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरवीन चावला ही अलीकडेच ‘स्टार प्लस’वरील सुजय घोष यांच्या ‘तीन पहेलिया’ या लघुपटात दिसली होती. आता ती या वाहिनीवरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या आगामी मालिकेतही एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ ही आठ वर्षांच्या मरियम (देश्ना दुगड) या मुलीच्या निरागस दृष्टिकोनाची कथा आहे. या मालिकेत खालिद सिद्दिकी, रुख्सार रेहमान, शीना बजाज, प्रियांका खंडवाल, एस. एम. झहीर आणि इतर अनेक दिग्गज कलाकार आहेत. आता त्यात सुरवीन चावलाची भर पडली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “निर्मात्यांना या मालिकेत सुरवीनला मोठी भूमिका द्यायची होती; पण तिच्या आधीच्या कमिटमेंटसमुळे आम्हाला तिच्याबरोबर थोडेच प्रसंग चित्रीत करता आले. त्यामुळे ती यात एक पाहुणी कलाकारच बनली आहे.”सुरवीनने बॉयफ्रेंड अक्षय ठक्कर याच्याशी विवाह केल्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली होती. वास्तविक तिने दोन वर्ष अगोदरच लग्न केले होते, परंतु त्याचा खुलासा केला नसल्याने तिने पुन्हा अशाप्रकारे शाही विवाह केला. सुरवीन चावलाने कही तो होगा या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली. या मालिकेनंतर ती अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये झळकली. पण ती खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली ते क्रिकेटर श्रीसंतसोबत असलेल्या तिच्या प्रेमप्रकरणामुळे... श्रीसंत आणि ती अनेक पार्टींमध्ये एकत्र दिसत असत. पण काहीच दिवसांत त्यांचे ब्रेकअप झाले. 24च्या दुसऱ्या सिझनमध्ये सुरविनने अनिल कपूरसोबत चुबंनृश्य दिले होते. त्या किसिंग सीनची चांगलीच चर्चा झाली होती.‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत नऊ वर्षांची चिमुरडी देशना दुगड मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. भोपालच्या पार्श्वभूमीवर मालिकेची कथा असणार आहे. या मालिकेपूर्वीही देशना 'इस प्यार को क्या नाम दूँ' आणि 'बाल कृष्ण' या मालिकेत झळकली होती. या मुलीचा जगाकडे पाहण्याचा निरागस दृष्टिकोन आपल्याला ताज्या हवेच्या झुळुकीसारखा ताजेतवाने करणारा ठरणार असल्याची मालिकेच्या टीमला खात्री आहे. सध्या अनेक मालिकेत बच्चेकंपनीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा बच्चेकंपनीला आपण लहान भूमिका करताना पाहिले आहे. मात्र आता तसे नसून बच्चेकंपनी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'कुल्फी कुमार बाजेवाला' मालिकेतही आकृती शर्मा ही सात वर्षाची चिमुरडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'कुल्फी कुमार बाजेवाला'प्रमाणेच 'मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह'ही मालिका रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.Also Read : बिग बी अमिताभ बच्चनहे आहेत ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेतीला या बालकलाकाराचे फॅन!