Join us

अरबाज पाठोपाठ रोनित रॉयनेही केलं दुसर लग्न; 20 वर्षानंतर पुन्हा पत्नीसोबत बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 11:55 IST

Ronit roy: रोनितने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

सध्या कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत आहेत. त्यामुळे मराठीसह बॉलिवूडमधील अनेक जोड्या लग्नाची गाठ बांधत आहेत. नुकताच अभिनेता अरबाज खान (arbaaz khan) आणि शूरा खान यांचा निकाह झाला. अरबाज याचा हा दुसरा निकाह आहे. त्यामुळे त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगतीये. या चर्चांमध्येच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता रोनित रॉय (ronit roy) यानेही दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. २५ डिसेंबरला रोनित रॉयने मोठ्या थाटामाटात लग्न केलं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रोनित रॉय याने त्याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर अनेक जण थक्क झाले आहेत. तर, रोनितने नेमकं कोणासोबत दुसरं लग्न केलं हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोणासोबत केलं रोनित रॉयने दुसरं लग्न

रोनित रॉयने त्यांच्याच पत्नीसोबत दुसरं लग्न केलं आहे. लग्नाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या जोडीने पुन्हा दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. ‘मुझसे शादी करोगी? फिर से’, असं कॅप्शन लिहित रोनितने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, रोनित आणि निलम यांनी हिंदू रितीरिवाजानुसार पुन्हा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहिल्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. रोनित रॉय आणि नीलम बोस यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. त्याआधी साडेतीन वर्षांपर्यंत दोघं एकमेकांना डेट करत होते.

टॅग्स :रोनित रॉयटेलिव्हिजनसेलिब्रिटीअरबाज खानलग्न