‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 06:25 PM2021-01-30T18:25:49+5:302021-01-30T18:27:36+5:30

‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, दिलदार रोमँटिक कॉमेडी मालिका आहे.

Roshan Vichare's role in 'Tujh Maaz Jamatanya' is well received by the audience | ‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

googlenewsNext

अश्विनी, शुभंकर आणि पम्मी ही झी युवावरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतील पात्रं त्यांच्या अभिनयामुळे आणि मालिकेच्या कथेतील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे विशेष गाजत आहेत. सुप्रसिध्द अभिनेते- निर्मते  स्वप्निल मुनोत यांची निर्मिती असलेल्या ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना गोष्टीशी आणि मालिकेशी जोडून ठेवतोय. शुभंकरची भूमिका साकारणारा अभिनेता रोशन विचारे अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. 

रोशन यामध्ये यंगस्टर्सची भूमिका करतोय. यापूर्वी तो ‘लक्ष्मी नारायण’ या पौराणिक मालिकेतून ‘नारायण’ची भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकेत ‘शहाजी राजे भोसले’ यांची भूमिका साकारली होती. प्रत्येक पात्रं अचूकपणे आणि मेहनतीने साकारण्याची रोशनची तयारी हा त्याचा कलाकार म्हणून विशेष गुण आहे. 


निर्माते स्वप्निल मुनोत यांनी देखील रोशनची ही कला जाणली आणि आज रोशनची ही नवी भूमिका अनेकांना आवडत आहे. तसेच सर्व कलाकारांच्या मेहनतीमुळे, टीम वर्कमुळे आणि प्रेक्षकांच्या पसंतीमुळे ‘तुझं माझं जमतंय’ने ५० हून अधिक एपिसोड्स पूर्ण केले आहेत.


‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, दिलदार रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. ही मालिका अश्विनी आणि शुभंकर यांच्या प्रेमकथेभोवती फिरत आहे. यामध्ये रोशन विचारे आणि मोनिका बागुल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अपूर्वा नेमळेकर यामध्ये ‘पम्मी’ नावाची सुंदर आणि दिलखेचक भूमिका साकारतेय. प्रेक्षक देखील या मनोरंजक कथानक असलेल्या मालिकेचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

Web Title: Roshan Vichare's role in 'Tujh Maaz Jamatanya' is well received by the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.