Join us

"पब्लिसिटीसाठी कॅन्सरचा उपयोग करते...", रोजलीनचा हिना खानवर थेट आरोप; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:29 IST

रोजलीन खानने दोन वर्षांपूर्वी स्वत: कॅन्सरवर मात केली आहे. म्हणाली...

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. ती लवकर बरी व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहे. हिना सुद्धा कॅन्सरशी सामना करत असतानाही सोशल मीडियावर सतत अपडेट देत असते. तिला होत असलेला त्रास, त्यातून ती कशा सकारात्मक राहते हा संपूर्ण प्रवास ती सांगत असते. शिवाय हिना किमोथेरपीनंतर कामही करत आहे. दरम्यान कॅन्सर असतानाही हिना इतकी अॅक्टिव्ह राहते हे पाहून अभिनेत्री रोजलीन खानने (Rozlyn Khan) हा पीआर स्टंट असल्याचं वक्तव्य केलं आहे.  नेमकं काय म्हणाली रोजलीन?

रोजलीन खानने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "किमोथेरपीवेळी सगळे केस गळणं, टक्कल पडणं हे महिलेसाठी सर्वात दु:खदायक असतं. हे तुम्ही नॉर्मलाइज कसं करणार? पिंजऱ्यातली वाघीण आपली हिंमत दाखवू शकते का? स्टेज ३ मध्ये काय काय होतंय यावर ती बोलू शकते का? की तू प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी कॅन्सरचा उपयोग करुन घेत आहेस? तू आणि तुझ्यासारख्या महिलांचा हा खूपच विकृतपणा आणि निर्लज्जपणा आहे जे चुकीची माहिती पसरवून कॅन्सरचा उपयोग हेडलाईनमध्ये राहण्यासाठी करतात. तुम्हाला चांगलंच माहित आहे की भारतात मेडिकलसंबंधी चुकीची माहिती पसरवल्याने कोणतीही शिक्षा होत नाही. सोनाली बेंद्रे, मनीषा कोइराला, लिसा यांसारख्या अतिशय सभ्य आणि चांगल्या अभिनेत्री आहेत ज्या इतक्या खालच्या पातळीवर कधीच उतरल्या नाहीत."

रोजलीनने आणखी एक स्टोरी शेअर करत लिहिले, "जे जीवघेण्या आजाराचा सामना करत आहेत त्यांच्याप्रती तुमची थोडीही सामाजिक जबाबदारी नाही का? की तुम्ही फक्त तुमच्या प्रोफेशनल हेतूसाठी कॅन्सरचा उपयोग करत आहात. ती तिच्या कॅन्सर स्टेजबद्दल किती खरी माहिती देत आहे मला शंकाच वाटत आहे. मी कॅन्सरची स्टेज ३ सर्वायवर आहे म्हणून विचारते की हिना कधी तिच्या MRM आणि रेडिएशनबद्दल बोलली का? पब्लिसिटी स्टंटसाठी कॅन्सरचा उपयोग करणाऱ्या अशा घाणेरड्या विचारांच्या लोकांसाठी मी प्रार्थना करते. चला कॅन्सर झालाच आहे तर बातमीच बनवू."

रोजलीन खानलाही ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. दोन वर्षांपूर्वी तिने कॅन्सरवर मात केली. ती सध्या कॅन्सरबाबतीत जनजागृती करते. रोजलीन काही हिंदी सिनेमांमध्ये झळकली आहे. 

टॅग्स :हिना खानटिव्ही कलाकारकर्करोगसोशल मीडियाट्रोल