Join us

"कॅन्सर रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत", हिना खानवर पुन्हा अभिनेत्रीचा निशाणा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:26 IST

कॅन्सरचे रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. रोजलिनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

कॅन्सरशी झुंज देत असलेली हिना खान रमजानच्या महिन्यात रोजाचा उपवास करत आहे. हिनाने सोशल मीडियावरुन इफ्तारीचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले होते. आता यावरुन पुन्हा एकदा अभिनेत्री रोजलिन खानने हिनावर निशाणा साधला आहे. कॅन्सरचे रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. रोजलिनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

काय म्हणाली रोजलिन खान? 

"मुस्लिम रोजा १३-१४ तासांचा असतो. यामध्ये तुम्हाला काहीही खाता किंवा पिता येत नाही. हे खूपच कठीण व्रत असतं. सामान्य व्यक्तीलाही हा उपवास ठेवणं कठीण जातं. त्यात रोजाच्या उपवासात जीम करणं म्हणजे...संध्याकाळी उपवास सोडल्यानंतरच हे शक्य आहे". 

"पण, जर कोणी कॅन्सरग्रस्त रुग्ण ज्याची केमोथेरेपी, टारगेट थेरेपी, किंवा इम्यूनोथेरेपी सुरू आहे आणि ती व्यक्ती रोजाचा उपवास करत असल्याचं सांगत असेल तर हे अशक्य आहे. कॅन्सरवर उपचार घेत असताना तुम्हाला योग्यप्रकारे आहार घ्यावा लागतो. त्याबरोबरच खूप पाणी पिऊन तुम्हाला शरीर हायड्रेटेड ठेवायचं असतं. अल्लाह मला माफ करेल कारण मी यावर्षीही रोजा नाही ठेवू शकत".

रोजलिन खान स्वत: एक कॅन्सरग्रस्त असून सध्या उपचार घेत आहे. याआधीही तिने हिनावर टीका केली होती. आता पुन्हा तिने हिनाने रोजाचा उपवास ठेवल्यामुळे तिच्यावर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :हिना खानकर्करोगटिव्ही कलाकार