Join us  

"आई झाल्यानंतर 'भाभी' च्या भूमिका...", रुबिना दिलैकने सांगितलं इंडस्ट्रीतील कटू सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 1:09 PM

जुळ्या बाळांच्या जन्मानंतर काही दिवसातच रुबिनाने वजनही कमी केलं. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचं खूप कौतुक झालं.

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) काही महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म दिला. बाळांच्या जन्मानंतर काही दिवसातच रुबिनाने वजनही कमी केलं. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचं खूप कौतुक झालं. रुबिनाने प्रेग्नंसीदरम्यानच तिच्या 'किसी को बताया नही' पॉडकास्ट ला सुरुवात केली होती. अनेक सेलिब्रिटींच्या तिने मुलाखती घेतल्या. आता पॉडाकस्टच्या सीजन ३ मध्ये एका एपिसोडमध्ये तिने आई झाल्यानंतर कशा भूमिका ऑफर होत आहेत याचा खुलासा केला.

रुबिना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये अभिनेता शरद केळकरने हजेरी लावली. यामध्ये शरद केळकर म्हणाला, "आता सगळं बदललं आहे. आधीच्या अभिनेत्यांना टाईपकास्ट केलं जात नव्हतं." यावर रुबिनाने महिलांना आजही टाईपकास्ट केलं जातं असं वक्तव्य केलं. ती म्हणाली, "एकदा का अभिनेत्रीने लग्न केलं आणि ती आई झाली की त्या ब्रेकमध्ये तिच्या शरिरात अनेक बदल होतात. हे सगळ्यांनाच मान्य आहे. म्हणूनच अभिनेत्रींना लग्नानंतर 'भाभी' च्या भूमिका मिळायला लागल्या आहेत."

पुढे शरद केळकर म्हणाला की आजकाल अभिनेत्री आई झाल्यानंतर पुन्हा परफेक्ट बॉडीशेपवमध्ये येण्यासाठी मेहनत घेतात.  यावेळी त्याने करीना कपूर आणि रुबिनाचंही उदाहरण दिलं. यावर रुबिना म्हणाली,"मला तरी सुद्धा भाभी च्याच भूमिका ऑफर होत आहेत." यावर शरद म्हणाला,"अभिनेता आणि अभिनेत्रींच्या शेल्फ लाईफमध्ये फरक असतो हे एक कटू सत्य आहे."

टॅग्स :टिव्ही कलाकारपरिवारसोशल मीडिया