टेलिव्हिजनवरील अभिनेत्री रुबीना दिलाइकने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी एका मुलाखतीत तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले होते. रुबीना दिलाइकने सांगितले होते की बॉलिवूडमध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांना कसे कमी लेखले जाते. तसेच सहा वर्षांपूर्वी रूबीनाला बॉलिवूडमध्ये काम करायचे होते. पण तिला आलेल्या वाईट अनुभवामुळे बॉलिवूडमध्ये काम न करण्याची शपथ घेतली होती.
रुबिनाने सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सहा वर्षांपूर्वी रूबीनाला बॉलिवूडमध्ये काम करायचे होते आणि त्यासाठी तिने अनेक मीटिंगदेखील अटेंड केल्या. पण अनुभव वाईट आला. मला जाणवले की टेलिव्हिजनच्या कलाकारांना कमी लेखले जाते. टीव्ही एक्टर आहेस? अच्छा कोणता शो केला? आम्ही तर नाही पाहिला. तुम्हाला तुमचा बॅकग्राउंड आणि नावाच्या आधारावर जज केले जाते. तुम्ही कोणती कार चालवता ? तुमच्याकडे जिमी चूचे शूज आहे का? असे प्रश्न केले जातात आणि त्यावर तुमचे परिक्षण केले जाते. हे स्क्रीन टेस्ट वगैरे शेवटच्या गोष्टी आहे. या सर्व गोष्टी ऐकून माझे मन उडून गेले आणि मला असे वाटत होते की खरेच असे होते का? हे खूप आधीची गोष्ट आहे, तेव्हा मी बालीश होती.
माझे कुटुंब आम्हाला या सगळ्या गोष्टी करायला त्यावेळी परवानगी नाही द्यायचे. मी असे सांगितल्यावर तो दिग्दर्शक माझ्याकडे पाहात म्हणाला की मला तुझ्या तोंडावर पादावसे वाटते. मी ते ऐकून हादरलेच. त्यानंतर तो माझ्याकडे पाहून हसू लागला.'