Join us

त्यांचं निश्चितच योग्य नाही, पण...; ऊर्फी जावेद, गौतमी पाटीलला रुपाली चाकणकरांची 'समज'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 3:02 PM

राज्यात उर्फी आणि गौतमी सारख्या महिला महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावत आहेत.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे विचित्र ड्रेस आणि दुसरीकडे गौतमी पाटीलचे (Gautami Patil) अश्लील हावभाव यामुळे दोघीही चर्चेत आल्या. गौतमीने माफी मागत विषय संपवला तर उर्फी मात्र सर्वांना उलट उत्तरं देत सुटली. उर्फी आणि गौतमीच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याविरोधात अनेकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रारी दिल्या. आता या सर्व प्रकरणांवर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी उत्तर दिलं आहे.

राज्यात उर्फी आणि गौतमी सारख्या महिला महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावत आहेत. उर्फी विचित्र कपडे घालून बिंधास्त मुंबईच्या रस्त्यांवर फिरते तर दुसरीकडे लावणीच्या नावाखाली गौतमी पाटील अश्लील हावभाव करत नृत्य करतेय. यामुळे अनेकांचा संताप झाला आहे. त्यांच्यावर कारवाई होणार की नाही या प्रश्नावर रुपाली चाकणकर  म्हणाल्या, 'राज्यघटनेने सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्याचा, भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणी काय घालावं काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे.  एखादी गोष्ट तुम्हाला अश्लील वाटत असेल पण दुसऱ्याला ती शील वाटत असेल. शील अश्लीलतेची परिभाषा आपण करु शकत नाही.'

त्या पुढे म्हणाल्या,' यावर आपण काही कारवाई करु शकत नाही पण त्यांना समज देऊ शकतो. कायदा पाहता सगळ्याची परिमानं ठरलेली असतात. ' असं स्पष्ट मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे.

सध्या गौतमी पाटीलचा सगळीकडेच धुमाकूळ आहे. तिच्या कार्यक्रमांना गावागावात तुफान गर्दी होत असते. मात्र ती जे करतेय ते लावणी नाही अशी टीकाही गौतमीवर होत आहे. अजित पवारांनी नाराजी दर्शवल्यानंतर गौतमीने माफी मागितली होती. तर दुसरीकडे उर्फी जावेदच्या वागण्यात मात्र अद्याप बदल झालेला नाही.

टॅग्स :रुपाली चाकणकरउर्फी जावेदगौतमी पाटीलमहाराष्ट्र