Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुजा बागवेला मिळाली हिंदी मालिका, Bigg Boss 10 फेम अंकित गुप्तासोबत मुख्य भूमिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:32 IST

ऋतुजा बागवेची हिंदी कलाविश्वात एन्ट्री

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) 'नांदा सौख्यभरे' मालिकेतून लोकप्रिय झाली. शिवाय तिचं 'अनन्या' हे नाटकही खूप गाजलं. यातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. काही महिन्यांपूर्वी ती 'लंडन मिसळ' या सिनेमात झळकली. ऋतुजाच्या चाहत्यांसाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. ती आता पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. पण मराठी नाही तर ती हिंदी मालिकेत झळकणार आहे. 

'बिग बॉस 10' फेम स्पर्धक अंकित गुप्तासोबत ऋतुजा बागवेची नव्या हिंदी मालिकेत एन्ट्री झाली आहे. यामध्ये ऋतुजा मुख्य भूमिकेत आहे. 'माती से बंधी डोर' या हिंदी मालिकेत ऋतुजा 'वैजू' ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या संधीबद्दल ऋतुजा म्हणाली, "मी बऱ्याच दिवसांपासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. नाटक, सिनेमा केला पण पुन्हा डेली सोप करावीशी वाटत होती. पडद्यावर सतत दिसायला हवं तरच कलाकार म्हणून आपण जीवंत असतो. मालिकेमुळे ते शक्य होतं. हे माध्यम नक्कीच आव्हानात्मक आहे. मालिकेतील माझी भूमिका मला वेगळी वाटली. मला वेगळं काहीतरी करायचंच होतं. सर्व बाजूंनी विचार करुन मी मालिकेला होकार दिला."

ऋतुजाच्या अभिनयाची ताकद सर्वांनीच 'अनन्या' नाटकातून पाहिलीच आहे. यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळालेत. आता ती हिंदी मालिका गाजवण्यासाठीही सज्ज झाली आहे. सई ताम्हणकर, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी सह अनेक मराठी हिंदी कलाविश्वात डंका गाजवत आहेत. आता त्यात ऋतुजाचाही समावेश झाला आहे.

टॅग्स :ऋतुजा बागवेहिंदीमराठी अभिनेताटिव्ही कलाकार