‘सा रे ग म प’मध्ये शाहरूखने धरला ‘पिंगा’वर ठेका!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2016 11:48 AM2016-04-15T11:48:07+5:302016-04-15T17:18:07+5:30
झी टीव्हीवरील सर्वात दीर्घ काळ चाललेल्या गाण्यांच्या स्पर्धेच्या ‘सा रे ग म प’या रिअॅलिटी शोच्या ग्रॅण्ड प्रीमिअर कार्यक्रमाची प्रतीक्षा ...
झ टीव्हीवरील सर्वात दीर्घ काळ चाललेल्या गाण्यांच्या स्पर्धेच्या ‘सा रे ग म प’या रिअॅलिटी शोच्या ग्रॅण्ड प्रीमिअर कार्यक्रमाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून या शनिवारी या कार्यक्रमातील अंतिम 12 स्पर्धक आपल्या मधाळ स्वरांनी श्रोत्यांचे कान तृप्त करण्यास सिध्द झाले आहेत. त्यांना बॉलीवूडचा सम्राट सुपरस्टार शाहरूख खानची साथ लाभली असून ‘फॅन’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी तो या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या शोमध्ये शाहरूखने धम्माल मस्ती केली.इतकेच नव्हे, 'पोरी पिंगा ग पोरी पिंगा' या लोकप्रिय गाण्यावरही तो थिरकला. त्याला साजिद-वाजिद, प्रीतम चक्रबर्ती आणिमिकानेही साथ दिली. एक स्पर्धक सेंज्योती दासने हे गाणे अतिशय खणखणीत स्वरात म्हटल्यानंतर लगेचच शाहरूखने मंचावर प्रवेश केला. ते पाहताच या गाण्याची मूळ गायिका आणि 'सा रे ग म प'ची पूवीर्ची स्पर्धक वैशाली म्हात्रे हिनेही सेंज्योतीबरोबर हे गाणे गाण्यास सुरुवात केली. वैशाली ही ज्यूरी सदस्यच्या रूपाने स्पर्धकांना मार्गदर्शनही करीत आहे. प्रेक्षकांच्या जोरदार मागणीमुळे शाहरूख खाननेही या गाण्याच्या ओळी गायल्या आणि थोडेसे नृत्यही केले. यामुळे सारे प्रेक्षक आणि ज्यूरीही अचंबित झाले! 'अपुन बोला' हे गाणे शाहरूखने स्वत:च्या आवाजात गायले होते. पण त्या गाण्याच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना शाहरूख म्हणाला, ‘जोश’ सिनेमातलं 'अपुन बोला' हे गाणं मी गायलं आहे खरं, पण त्यासाठी त्या गाण्यातली प्रत्येक ओळ अनेक तुकड्यांमध्ये विभागावी लागली. इतकंच नाही, तर नंतरही माज्या आवाजातलं गाणं सुरा-तालात येण्यासाठी त्याचं नीट संपादन करावं लागलं.त्याच्या या कबुलीमुळे प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडाले. साहजिकच 'सा रे ग म प'च्या अंतिम 12 स्पर्धकांना अप्रतिम सुरात गाताना पाहून शाहरूख खान थक्क झाला. 'सा रे ग म प'च्या या प्रतिष्ठेच्या मंचावर उत्कृष्ट कलाकारांची अदाकारी मला अनुभवण्यास मिळाली, हे माझं सुदैवच आहे. मला तर एक ओळहीसुरात म्हणता येत नाही आणि हे कलाकार एकामगोमाग एक गाणी अप्रतिम आवाजात गात आहेत,असं तो म्हणाला.
देशभरातून अंतिम 12 उमेदवारांची निवड केल्यानंतर 2016 सालच्या 'सा रे ग म प'च्या सांगितिक युध्दाला 16 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. ज्या 12 स्पर्धकांची देशाच्या विविध भागांतून निवड करण्यात आली आहे, त्यांची नावे अशी : हरज्योत कौर, रुपाली जग्गा, सेंज्योती दास, ज्योतिक तंगरी, जगप्रीत बाजवा, तन्वीर हुसेन, अश्मिता कर, हश्मत-सुल्ताना, झुबेर हाश्मी, सचिनकुमार वाल्मिकन, कुशल पॉल आणि अभिग्यान दास.
देशभरातून अंतिम 12 उमेदवारांची निवड केल्यानंतर 2016 सालच्या 'सा रे ग म प'च्या सांगितिक युध्दाला 16 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. ज्या 12 स्पर्धकांची देशाच्या विविध भागांतून निवड करण्यात आली आहे, त्यांची नावे अशी : हरज्योत कौर, रुपाली जग्गा, सेंज्योती दास, ज्योतिक तंगरी, जगप्रीत बाजवा, तन्वीर हुसेन, अश्मिता कर, हश्मत-सुल्ताना, झुबेर हाश्मी, सचिनकुमार वाल्मिकन, कुशल पॉल आणि अभिग्यान दास.