Join us

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्याची लगीनघाई! थाटात पार पडला मेहेंदी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:18 IST

अभिषेकची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. 

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्याच्या घरीही लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मालिकेत श्रीनूची भूमिका साकारणार अभिनेता अभिषेक गावकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिषेकची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. 

अभिषेक गावकर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता. आता त्यांच्या घरी लगीनसराई सुरू आहे. नुकतंच अभिषेक-सोनालीचा मेहेंदीचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. मेहेंदी सोहळ्यासाठी अभिषेकने कुर्ता परिधान केला होता. तर पिवळ्या रंगाच्या स्कर्ट टॉपमध्ये सोनालीचं सौंदर्य खुलून आलं होतं. सोनालीने मेहेंदी सोहळ्यातील काही खास क्षण इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. 

दरम्यान, अभिषेकने 'रात्रीस खेळ चाले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं,' 'माझी माणसं', 'हंडरेड डेज' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सोनाली एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिचे अनेक रील व्हिडिओही व्हायरल होत असतात. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंगमराठी अभिनेता