स्टार भारत वाहिनीवर १६ ऑगस्टपासून ‘तेरा मेरा साथ रहे’ ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत प्रख्यात अभिनेत्री रूपल पटेल या मिथिला या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या व्यक्तिरेखेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्तीरेखेला जिवंत करण्यासाठी स्वत: रूपल पटेल यांनीच वेशभूषाकार आणि स्टायलिस्ट यांच्याशी चर्चा करून नवा लूक डिझाईन केला आहे.
सर्वसाधारणपणे टीव्ही मालिकांमधील कलाकार वेशभूषाकार आणि स्टायलिस्ट सांगतील त्यानुसार स्वत:ला प्रेक्षकांसमोर सादर करीत असतात. परंतु, व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यासाठी प्रत्येक व्यक्तिरेखेचा वेगळा लुक तयार करावा लागतो. तो लुक तयार करण्यासाठी करावा लागणारा विचार अभिनेत्री रूपल पटेल यांनी स्टायलिस्ट आणि वेशभूषाकार यांच्या जोडीने करून काही वैशिष्ट्यपूर्ण बदल करून मग नवा लुक आपल्या व्यक्तिरेखेला देण्याचा प्रयत्न केला आहे.अभिनेत्री रूपल पटेल आपल्या नव्या व्यक्तिरेखेबाबत सांगताना म्हणाल्या की, ‘मला मिळालेल्या व्यक्तिरेखेसाठी स्टायलिंग करण्याची इच्छा खूप होती. तशी संधी आपल्याला प्रथमच मिळाली आहे. कारण मला असे वाटते की, व्यक्तिरेखा अधिक सजीव करण्यासाठी तिचे स्टायलिंग सहाय्यभूत ठरते. मिथिला या व्यक्तिरेखेकडे प्रेक्षकांचे लक्ष जावे आणि त्यातून त्या व्यक्तिरेखेच्या लुकमधून ती सजीव करता येते.’