Join us  

ऐश्वर्या नारकर यांचा बालपणीचा हा गोंडस फोटो पाहिलात का? पाहा कशा दिसायच्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:18 AM

ऐश्वर्या नारकर यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्या त्याच्या मालिकेसाठी नाही तर बालपणीच्या फोटोसाठी नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. ऐश्वर्या नारकरसोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. आताही ऐश्वर्या नारकर यांनी केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे. ऐश्वर्या यांनी त्यांचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो आता वेगाने व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या नारकर यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या पोस्टही नेटकऱ्यांमध्ये वाऱ्यासारख्या व्हायरल होतात. नुकतेच ऐश्वर्या यांनी एक गोड फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी अगदीच छानसा परकर आणि ब्लाऊज घातल्याचं दिसून येत आहे. त्या खूपच गोंडस दिसत आहेत. हा त्यांचा फोटो ब्लॅक अँड व्हाइट स्वरुपात आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा हा बालपणीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. 

अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या 'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'रुपाली राज्याध्यक्ष' हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच सोशल मीडियावरही त्यांचा दांडगा वावर आहे. अभिनय, सौंदर्य आणि फिटनेस या तिन्ही बाबतीत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना तोड नाही.  

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीमराठी अभिनेतासोशल मीडिया