Join us

सचिन श्रॉफचा आहे 'या' गोष्टीवर विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 06:30 IST

आझादी की रात हा आगामी एपिसोड स्वतंत्रता दिवसाला समर्पित केलेला आहे आणि त्यात लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता सचिन श्रॉफ जेलरच्या भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देआझादी की रातमध्ये झपाटलेल्या तुरूंगाची भीतीदायक कथा आहे

या वीकेंडला कलर्सचा भयपट कौन है ? अजून एका अंगावर शहारे आणणाऱ्या अमानवी कथेसह परत येत आहे. आझादी की रात हा आगामी एपिसोड स्वतंत्रता दिवसाला समर्पित केलेला आहे आणि त्यात लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता सचिन श्रॉफ जेलरच्या भूमिकेत दिसणार आहे.

आझादी की रातमध्ये झपाटलेल्या तुरूंगाची भीतीदायक कथा सांगितलेली आहे जो भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत बंद होता. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुरूंग उघडण्याचे ठरविले आणि एका नवीन जेलरला तेथे नेमले (सचिन श्रॉफ). तो येण्याच्या वेळी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना घाबरविण्याचे भीतीदायक प्रकार चालू झाले. कथा पुढे सरकत असताना, त्या कुटुंबाला कळून चुकले की स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी स्वातंत्र्यसैनिकांनी ठार केलेल्या ब्रिटीश जेलरचा आत्मा त्याच्या मृत्युचा सूड उगविण्यासाठी आलेला आहे. त्याच्या भूमिके विषयी बोलताना सचिन श्रॉफ म्हणाला, “ मी एका इन्स्पेक्टरची भूमिका करत असून त्याचा अमानवी गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, जोपर्यंत त्याला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत. पण वास्तविक जीवनात माझा अमानवी शक्तींवर विश्वास आहे. इतर शो पेक्षा कौन है मध्ये काम करण्याचा माझा अनुभव अगदी वेगळा आहे कारण हा शो वेगळा आहे. एक अभिनेता म्हणून वेगवेगळे प्रकार करण्याची गरज असते आणि ही संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.”