Join us

What !सागर कारंडे, भारत गणेशपुरे 'चला हवा येऊ द्या'मधून पडणार बाहेर? जाणून घ्या यामागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:23 PM

Chala Hawa Yeu Dya: सागर कारंडे (Sagar Karande) आणि भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांनी हा शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. त्यांच्या चाहत्यांना हे ऐकून धक्का बसला.

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोचा भारतासह जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. या शोमधील कलाकारांनी आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना आजवर खळखळून हसवले. या शोमधून निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugde), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), सागर कारंडे (Sagar Karande) हे कलाकार घराघरात पोहचले. दरम्यान सागर कारंडे (Sagar Karande) आणि भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांनी हा शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. त्यांच्या चाहत्यांना हे ऐकून धक्का देखील बसला. 

भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे दोघेही हिंदी कॉमेडी  शो 'इंडियाज् लाफ्टर चॅम्पियन'मध्ये झळणार आहे. हिंदी सोनी वाहिनीवर लवकरच एक नवा कॉमेडी शो सुरु होत आहे. या कार्यक्रमात ते दोघेही सहभागी होणार आहेत. शनिवार-रविवारी दोन दिवस हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. या शो मध्ये जजच्या खूर्चीत विराजमान होणार आहेत अर्चना पुराण सिंग आणि शेखर सुमन. तर शनिवारच्या भागात शो मध्ये शिल्पा शेट्टीच्या 'निकम्मा' सिनेमाची टीम हजेरी लावणार आहेत. सोनी टीव्ही ही आपल्या इंडियाज् लाफ्टर चॅम्पियन या नव्या कॉमेडी शोबाबत फार जास्त उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. खूप दिवसांनी लोकांचे ताणतणाव दूर करण्याची संधी मिळत असल्याचे मत वाहिनीने मांडले आहे. 

 सोनीच्या 'इंडियाज् लाफ्टर चॅम्पियन' कॉमेडी शोमध्ये भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे विनोद करताना दिसणार आहेत. याच कारणामुळे ते चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात ते दिसणार नसल्याची चर्चा सुरु झाली. मात्र यात काहीही तथ्य नाही आहे. कारण  या दोन्ही शो च्या शूटिंगचे दिवस हे वेगळे असल्या कारणानं या दोघांनाही दोन्ही शो,त्याचं शूटिंग आणि त्याच्या वेळा व्यवस्थित मॅनेज करता येणार आहेत. त्यामुळे सागर कारंडे आणि भारत गणेशपुरेच्या चाहत्यांसाठी डबल खुषखबर आहे ही. ते या दोनही शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. 

टॅग्स :चला हवा येऊ द्यासेलिब्रिटीझी मराठी