Join us

सहकुटुंब सहपरिवार: अखेर मोरे परिवार येणार एकत्र; असा होणार मालिकेचा शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 14:30 IST

Sahakutumb sahaparivar: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शेवटच्या भागात काय घडतं हे दाखवण्यात आलं आहे.

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. परंतु, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पार पडलं. यावेळी मालिकेतील प्रत्येक कलाकार भावूक झाला होता. त्यानंतर आता या मालिकेच्या शेवटच्या भागात काय होणार हे समोर आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शेवटच्या भागात काय घडतं हे दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हा भाग पाहण्यास चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

मध्यंतरी मोरे कुटुंबामध्ये वादाची ठिणगी पडली होती. ज्यामुळे चारही भाऊ एकमेकांपासून दुरावले होते. इतकंच नाही तर प्रत्येकाने त्यांचा वेगळा संसार थाटला होता. परंतु, या मालिकेच्या शेवटी हे चारही भाऊ पुन्हा एकदा पूर्वीसारखे एकत्र येणार आहेत. त्यामुळे मोरे परिवार पुन्हा एकदा एकत्र नांदणार आहेत. 'ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड... 'सहकुटुंब सहपरिवार' कहाणी सफळ संपूर्ण..', असं कॅप्शन देत या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी