Join us  

आंखों से सब कह दिया..! साक्षीने वेधलं सहज सुंदर लूकमुळे चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 2:30 PM

Sakshi gandhi:साक्षीने अल्पावधीमध्ये मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात तिची हक्काची जागा निर्माण केली आहे.

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे साक्षी गांधी (sakshi gandhi ). या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळाली. साक्षी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते. यात कधी ती तिच्या प्रोफेशनल वा कधी पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या साक्षीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने विद्या बालनच्या 'परिणिता' या सिनेमातील 'पियू बोले पिया बोले' या गाण्यावर रील केल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओसाठी तिने फ्लोरल प्रिंट असलेला छान वनपीस ड्रेस परिधान केला आहे. सोबतच हलकासा मेकअपही केला आहे. त्यामुळे या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

दरम्यान, साक्षीने अल्पावधीमध्ये मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात तिची हक्काची जागा निर्माण केली आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेनंतर ती 'नवी जन्मेन मी' या मालिकेत झळकली.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारविद्या बालन