सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सईने नुकतेच साडी परिधान केलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. यात तिने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. केसात गजरा अशा ट्रेडिशनल लूककमध्ये सई दिसतेय. फॅन्सनाही साडीमधला तिचा हा अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच सईचा बोलबाला असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.