Join us

Lock Upp: साईशा-कंगनामध्ये वादाची ठिणगी; अर्ध्यावरच सोडला साईशाने शो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 18:58 IST

Lock upp: जेलमध्ये मिळत असलेल्या जेवणाविषयी साईशा तक्रार करत होती. तसंच जेलमध्ये असलेल्या गार्डसलाही तिने चुकीचा वागणूक दिली. त्यामुळे कंगनाने साईशाची कानउघडणी केली.

सध्या सोशल मीडियावर लॉक अप (Lock Upp) हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चिला जात आहे. सोशल मीडियावर कायम वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत येणाऱ्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. यामध्येच प्रसिद्ध ट्रान्सवुमन फॅशन डिझायन साईशा शिंदेनेदेखील (Saisha Shinde) सहभाग घेतला आहे. मात्र, आता ती हा शो सोडून जात असल्याचं  सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि साईशामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे.

अल्ट बालाजीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात कंगना आणि साईशामध्ये वाद झाल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर साईशा रहायला लागते आणि त्यामुळे मुनव्वर तिला समजवायचा प्रयत्न करतो.

जेलमध्ये मिळत असलेल्या जेवणाविषयी साईशा तक्रार करत होती. तसंच जेलमध्ये असलेल्या गार्डसलाही तिने चुकीचा वागणूक दिली. त्यामुळे कंगनाने साईशाची कानउघडणी केली. परंतु, यावर मी माफी मागणार नाही असं साईशाने सांगितलं. ज्यामुळे कंगना संतापली.

'मी माफी मागणार नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा', असं साईशा म्हणाली. त्यावर भडकलेल्या कंगनाने साईशाला खेळातील सर्वात कमजोर स्पर्धक असल्याचं म्हटलं.'मला वाटतं तू या शोमधील सर्वात बेजबाबदार आणि कमजोर स्पर्धक आहेस',असं कंगना म्हणते. 

दरम्यान, कंगनाचे हे वाक्य ऐकल्यावर साईशा रडते आणि तिची बॅग भरायला घेते. तसंच मी हा शो सोडून जात नाहीयेत. तर मला कंगना यातून बाहेर काढतीये असंही ती मुनव्वर फारुकीला सांगते. परंतु, त्यानंतर साईशाला या शोमधून एलिनिमेट केलं जातं.

टॅग्स :कंगना राणौतटिव्ही कलाकारटेलिव्हिजनसेलिब्रिटी