'बिग बॉस' आणि 'वाद' हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या १४ सीझनपासून सुरु असलेली वादाची परंपरा यंदाही कायम आहे.एरव्ही वाद शो सुरु झाल्यानंतर व्हायचे. यावेळी शो सुरु होण्याआधीच वाद निर्माण झाला आहे.सलमान खानचा टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 15 आजपासून सुरू होत आहे. जरी हा शो फक्त वादांसाठी ओळखला जात असला तरी यावेळी बिग बॉस सुरू होण्याआधीच वादात अडकलेला दिसतोय.
यावेळी सर्वात जास्त वाद रिया चक्रवर्तीच्या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहे.याच कारणामुळे हा शो बायकॉट करण्याची मागणी रसिक करत आहेत.या नव्या वादामुळे सलमान खान, बिग बॉस प्रसारित करणारी वाहिनी यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
रिया चक्रवर्तीसह नेटीझन्स सोशल मीडियावर सलमान खान आणि बिग बॉस निर्मात्यांना जोरदार ट्रोल करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की बिग बॉसच्या निर्मात्यांना सुशांतच्या मृत्यूचा कट रचणाऱ्या रिया चक्रवर्तीला मुद्दाम बोलावायचे आहे, जेणेकरून ती सुशांतच्या नावाने शोला टीआरपी मिळवून देईल.त्याच वेळी, काही लोक असेही म्हणतात की रियाला शोमध्ये बोलावून, निर्माते ती निर्दोष असल्याचे राष्ट्रीय टीव्हीवर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुशांतने जून 2020 मध्ये आत्महत्या केली. यानंतर, सुशांतच्या कुटुंबासह, जनतेने रियाला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार मानले. नंतर रियावर आरोप झाले की तिने सुशांतला औषधे दिली. अगदी NCB ने तिला अटक केली आणि ती अनेक दिवस तुरुंगात राहिली. नंतर रिया चक्रवर्तीची जामिनावर सुटका झाली.
'बिग बॉस'च्या यंदाच्या सिझनमध्ये कोणते चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी होणार याकडे तर्कवितर्क लावले जात होते. यंदाच्या सिझनमध्ये तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल बिष्ट, उमर रियाज, करन कुंद्रा, ईशान सहगल आणि सिंबा नागपाल, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, विधि पंड्या, विशाल कोटियन आणि जय भानुशाली हे कलाकार दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरात काय काय घडणार हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.