बॉलिवूड अभिनेत्री महेक चहलची (Mahek Chahal) प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आता महेक चहलच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. मात्र ती अजूनही रुग्णालयातच आहे. नुकतेच महेकने तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिले आहे.
आपल्या तब्येतीबद्दल बोलताना महेक चहल म्हणाली- "मला न्यूमोनिया झाला. त्यामुळे मी 3-4 दिवस आयसीयूमध्ये राहिले. मला ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मी 2 जानेवारीला अचानक कोसळले होते, मला श्वास घेता येत नव्हता. त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि डॉक्टरांनी मला लगेच एडमिट केले. माझे सीटी स्कॅन झाले. 8 दिवस झाले."
"मी अजूनही रुग्णालयात आहे. मात्र, मी आता जनरल वॉर्डमध्ये आहे. माझी तब्येत बरीच सुधारली आहे पण तरीही श्वास घेण्यास त्रास होत आहे." याशिवाय महेकने सांगितले की, तेव्हा ती खूप घाबरली होती. मेहक म्हणाली- "माझ्या आयुष्यात मी अशा टप्प्यावर कधीच आले नव्हते जिथे मला श्वास घेता येत नव्हता. प्रत्येक वेळी खोकताना मला वेदना होत होत्या. पण मला वाटलं सगळं ठीक होईल."
महेकने पुढे सांगितले की, "तिला आराम करायचा होता त्यामुळे तिने कोणाशीही संपर्क साधला नाही. पूर्वी मला सामान्य सर्दी झाली आहे असे वाटत होते. सर्दी आणि खोकला इतका गंभीर असू शकतो हे मला माहीत नव्हते. महेक सलमान खानच्या रिएलिटी शो 'बिग बॉस'च्या 5 व्या सीझनमध्ये देखील सहभागी झाली होती. याशिवाय तिने अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"