Join us  

'बिग बॉस हिंदी 18'च्या ग्रँड प्रिमियरची तारीख जाहीर, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:19 AM

'बिग बॉस 18' चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. 

Bigg Boss 18 Promo : मनोरंजनाचा 'बॉस' असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. सध्या महाराष्ट्रात 'बिग बॉस मराठी'ची चर्चा आहे. मराठी पाठोपाठ आता 'बिग बॉस हिंदी'चं आठरावं पर्वदेखील लवकरच सुरू होणार आहे. कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार्‍या 'बिग बॉस 18' चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. 

'बिग बॉस हिंदी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) शोच्या ग्रँड प्रिमियर तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) पाहायला मिळतोय. सलमान होस्ट करत असलेलं हे 'बिग बॉस'चं आठरावं पर्व ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. अर्थात येत्या 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता  'बिग बॉस 18'चा ग्रँड प्रिमियर होणार आहे. 

'बिग बॉस 18' च्या घराची थीमही समोर आली आहे. प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे, "इस बार घर में भूचाल आएगा, क्योंकि बिग बॉस में टाइम का तांडव आएगा!".  तर सलमान खान प्रोमोमध्ये म्हणतो,  "यंदा बिग बॉस पाहणार घरातील स्पर्धकांचं भविष्य, कोण बदलणार आपलं लिहलेलं नशीब".  यावरुन यंदाची थीम ही टाइम ट्रॅव्हलवर आधारित असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस 18' ची चर्चा रंगली आहे.  नव्या पर्वाबद्दल आणि यंदाच्या स्पर्धकांबद्दल 'बिग बॉस' प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.  स्पर्धकांच्या यादीत धीरज धूपर, निया शर्मा, शोएब इब्राहिम, सुरभी ज्योती, सोमी अली, राज कुंद्रा, डॉली चायवाला आणि करण पटेल  यांच्यासह अनेकांच्या नावांची चर्चा आहे. चाहते सलमान खानला पुन्हा एकदा बिग बॉस होस्ट करताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.  

टॅग्स :सलमान खानबिग बॉसटिव्ही कलाकारकलर्स