सगळ्यात विवादीत शो बिग बॉसचा यंदाचा सिझनही चांगलाच गाजतो आहे. दिवसागणिक या शोमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातील प्रत्येक स्पर्धक मोठ्या चालाकीने खेळी खेळत आहे. सुरूवातीला शोला रसिकांनी पसंती दिली नव्हती. मात्र हळुहळु शोने रसिकांची पसंती मिळवली आणि चांगली टीआरपी मिळवत आहे. राखी सावंतच्या एंट्रीने घरातच काय तर सोशल मीडियावर धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे राखीच्या ड्रामेबाजीने रसिकांनी पाठ फिरवलेल्या शोकडे पुन्हा वळवण्यास भाग पाडले.
अनेक चढ उतार शोमध्ये पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या निर्मांत्यांनी शो बाबत पहिल्यांदाच मोठा निर्णय घेतला आहे. आता पर्यंत शो १५० दिवसांचा असायचा. आता हा शो आणखीन काही काळ सुरू ठेवण्यावर निर्माते विचार करत आहेत.
हा शो आता जानेवारीमध्ये संपणार होता. मात्र मिळालेल्या भरघोस पसंती मुळे 'बिग बॉस १४' आता मार्चमध्ये संपणार असल्याचे समजतेय. यंदाचे फिनालेचा सिझन हा मार्चमध्ये होणार असल्याचे कळतंय. याबाबत शोकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय.
Bigg Boss 14 : ‘एंटरटेनमेंट’च्या नादात राखी सावंतने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापले स्पर्धक
आज मंगळवारी टेलिकास्ट होणा-या एपिसोडचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे. यात राखी भूताच्या गेटअपमध्ये दिसतेय. मी घरात कोणालाच कॅप्टन बनू देणार नाही, असे म्हणत ती एकएका स्पर्धकाची छेड काढायला सुरुवात करते. याचदरम्यान टास्कदरम्यान ही बया काय करते तर राहुल महाजनची धोती फाडते. हे पाहून सगळेच शॉक्ड होतात.
अली गोनी, राहुल वैद्य, अभिनव शुक्ला राखीच्या या कृत्यामुळे प्रचंड संतापतात. हेच एखाद्या महिलेसोबत झाले तर चालेल का? असे म्हणत अली गोनी टास्क करण्यास स्पष्टपणे नकार देतो. यानंतर काय घडते,हे पाहण्यासाठी तुम्हाला आजचा बिग बॉस 14 चा एपिसोड पाहावा लागणार.
बिग बॉसमध्ये दिसणार राखी सावंतचा पती?
राखी याआधी देखील बिग बॉसच्या घरात झळकली होती. त्यावेळी तिच्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे. बिग बॉसमध्ये राखी तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे. राखीच्या लग्नाविषयी तिच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. राखी सावंतच्या पतीला आजपर्यंत कोणीही पाहिले नाही. पण राखी बिग बॉसच्या घरात गेल्यापासून तिचा पती विविध वाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहे. आता तर एका मुलाखतीत रितेशने बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा वर्तवली आहे.