'बिग बॉस 14' चा फिनाले फार दूर नाही, लवकरच प्रेक्षकांना विजेत्याचे नावही कळेल. पुढील आठवड्यात सलमान खान 'बिग बॉस 14' च्या विजेता घोषित करेल. स्पर्धकांसह रसिकही बिग बॉस १४ चा विजेता कोण होणार याकडेच त्यांचे लक्ष लागले आहे. 'बिग बॉस 14' संपण्याआधीच 'बिग बॉस 15' चेही चाहत्यांसह सलमानलाही वेध लागले आहेत. शोच्या निर्मात्यांनी बिग बॉस 15 ची ही तयारी सुरू केली आहे.
स्पर्धकांसाठी तर हा केवळ एक शो आहे. त्यांना त्यांची रक्कम मिळणार आणि ते पुन्हा घरी परतणार. त्यांच्यासाठी अनेक संधी वाट पाहत आहेत. मात्र या शोच्या पडद्यामागे काम करणा-यांचे काय ? शो संपल्यानंतर त्यांना पेमेंट कुठून मिळणार. टीम दिवस रात्र एक करुन मेहनत करते. बिग बॉस संपणार असल्याचा मी आनंद व्यक्त करु की दु: ख हेच मला समजत नाहीय.
त्यानंतर सलमान पुढे म्हणाला, "कभी खुशी कभी गम ... मी पण 'बिग बॉस 14' संपवून माझ्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मला ईद कभी दिवाळी, टायगर 3 आणि पठाणसाठी शूट करायचे आहे. 'बिग बॉसच्या 15' व्या सीझनसाठी मी सज्ज होणार आहेय. यानंतर त्याने पुन्हा एकदा त्याच्या मानधनाबाबत जाहीरपणे बोलायला सुरुवात करताच अनेकांच्या भुवया उंचवाल्या असणार कारण पहिल्यांदाच तो शोकडून मिळणा-या मानधनाविषयी बोलताना दिसला.
सलमान खान म्हणाला की, "जेव्हा मी 'बिग बॉस 15' मध्ये सहभागी होईल तेव्हाच निर्माते माझे मानधन वाढवतील." सलमान आणि बिग बॉस हे समीकरण पक्के आहे. त्यामुळे नेहमीच शोच्या सुरुवातील त्याच्या मानधनावर चर्चा होते. वाढीव मानधन घेवूनच सलमान शोला होस्ट करतो. अद्याप निर्माते आणि सलमानचे पुढच्या शोसाठी काही बोलणी झाली असतील नसतील पण मानधनाचा विषय काढून निर्मात्यांचीही त्याने झोप उडवली असणार हे मात्र नक्की. त्यामुळे सलमान बिग बॉस १५ सिझन किती माधनासाठी राजी होणार हे पाहणे रंजक असणार आहे.