Join us

Salman Khan : जेव्हा 'लॉरेन्स'ने सलमान खानला सांगितलेला त्याचा फेव्हरेट हिरो; भाईजानचा 'तो' Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:20 PM

Salman Khan : सलमान खानचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 'लॉरेन्स' सलमानला त्याचा फेव्हरेट हिरो नेमका कोण आहे हे सांगत आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. कुटुंबासोबतच सलमानचे चाहतेही खूप चिंतेत आहेत. अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांची चिंता आणखी वाढली आहे. सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असून, याच गँगने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारही करण्यात आला. याच दरम्यान आता सलमान खानचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 'लॉरेन्स' सलमानला त्याचा फेव्हरेट हिरो नेमका कोण आहे हे सांगत आहे. मात्र हा लॉरेन्स म्हणजे लॉरेन्स बिश्नोई नसून एक दुसराच व्यक्ती आहे. सलमान खान एकदा कपिल शर्मा शोमध्ये आला होता. तेव्हा लॉरेन्स नावाच्या व्यक्तीने सलमान समोर त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. तोच व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये सलमान खान अनेकदा दिसला आहे. एकदा सलमान शोमध्ये आला होता तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने आपलं मत मांडलं. तो म्हणाला- "सर, माझं नाव लॉरेन्स आहे, मी बॉम्बेचा आहे. लहानपणापासून तुम्ही माझे फेव्हरेट हिरो आहात." यानंतर सलमान खानने दिलेली रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लॉरेन्स हे नाव ऐकून सलमानला हसूही येत नाही.

सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. यावेळी ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजमधून धमकी दिली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा व्यक्ती असल्याचं सांगितलं आहे. या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईसोबतचं दीर्घकाळापासून सुरू असलेलं वैर संपवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :सलमान खानद कपिल शर्मा शोबॉलिवूडसोशल व्हायरल