Join us  

सलमान खानची Ex गर्लफ्रेंड 'Bigg Boss 18' मध्ये घेणार एन्ट्री? तिच्या प्रेमात वेडा होता दबंग खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 2:50 PM

बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला गेली आहे.

बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला गेली आहे. प्रेक्षक 'बिग बॉस 18'ची (Bigg Boss 18) आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे.  'बिग बॉस 18' मध्ये स्पर्धक कोण असतील, याची चर्चा रंगू लागली आहे. यातच आता एका अभिनेत्रीचं नाव समोर येत आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री आणि दबंग खान सलमान ( Salman Khan)हे एकेकाळी रिलेशनशीपमध्ये होते. पण, दोघांच्या नात्याला वादाची किनार देखील आहे. 

सलमान खान आणि या अभिनेत्रीचं नात टिकलं नव्हतं. ब्रेकअपनंतर तिने सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते.  ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोमी अली  (Somy Ali) आहे. एकेकाळी सलमान खान हा सोमी अलीच्या प्रेमात वेडा झाला होता. असं म्हणतात की, तिच्यासाठीच त्यानं संगीता बिजलानीला सोडलं होतं. अर्थात इतकं करूनही सलमान-सोमीचं नातं फार काळ चाललं नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी कायमची भारत सोडून गेली. सोमी अलीने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता.  सोमीनंतर सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या राय आली होती.

आता अनेक वर्षांनंतर सोमी अली आणि सलमान खान 'बिग बॉस 18'शोमध्ये एकमेकांसमोर येऊ शकतात. पण, यावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.  सोमी अली वयाच्या ४७ व्या वर्षीही खूप फिट आणि स्टायलिश आहे. सोमी अलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोमी अलीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमानसोबत 'बुलंद' सिनेमात दोघांनी तिनं काम देखील केलं होतं.  

टॅग्स :सोमी अलीसलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूड