Join us  

क्रांती रेडकर नाही तर समीर वानखेडेंना आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री, खुलासा करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 11:51 AM

समीर वानखेडेंनी क्रांती रेडकरचा एकही चित्रपट पाहिलेला नाही, आवडत्या मराठी अभिनेत्रीबाबतही केला खुलासा

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे मुंबई क्रुज ड्ग्ज केस प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक करण्यात आली होती. समीर वानखेडेंची या प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यांचावर लाच घेतल्यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निडर आणि बेधडक अधिकारी अशी ओळख असलेल्या वानखेडेंनी अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते शोमध्ये हजेरी लावली होती. 

खुपते तिथे गुप्तेमध्ये अवधूत गुप्तेने वानखेडेंना प्रश्न विचारत बोलतं केलं. अवधूत गुप्तेच्या प्रश्नांना समीर वानखेडेंनी त्यांच्या स्वभावाप्रमाणेच अगदी रोखठोक उत्तरं दिली. या मुलाखतीत वानखेडेंनी अंडरवर्ल्ड, मुंबई ड्ग्ज केस या मुद्यांवर भाष्य केलं. अवधूत गुप्तेने वानखेडेंना त्यांच्या आवडत्या मराठी अभिनेत्रीबाबतही प्रश्न विचारला. "क्रांती रेडकर सोडून कोणती मराठी अभिनेत्री आवडते?" असा प्रश्न अवधूत गुप्तेने विचारला. यावर वानखेडेंनी अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं. "मला उर्मिला कानिटकर आवडते," असं वानखेडे म्हणाले. 

'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरचा दीपाबरोबर व्हिडिओ कॉल, कौतुक करत म्हणाला...

"क्रांतीचं कोंबडी पळाली की  दुसरं कोणतं गाणं आवडतं?" असा प्रश्नही वानखेडेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देत ते म्हणाले, "मी फारसा चित्रपट पाहत नाही. माझ्या पत्नीचा एकही चित्रपट मी पाहिलेला नाही. पण कोंबडी पळाली हे गाणं मी पाहिलं आहे आणि मला ते आवडतं," असं वानखेडे म्हणाले. 

समीर वानखेडे यांनी मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरशी २०१७ साली लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. हे त्यांचं दुसरं लग्न आहे. वानखेडे आणि क्रांती यांना दोन जुळ्या मुली आहेत. 

टॅग्स :समीर वानखेडेक्रांती रेडकर