एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा वेगळाच दरारा आहे. मधल्या काळात ड्रग्सप्रकरणात सर्वांनाच त्यांची ओळख झाली. समीर वानखेडे कस्टम विभागात असताना विमानतळावर कोणालाही जुमानत होते. कोण सेलिब्रिटी आहे, की कलाकार आहे हे न पाहता आपली ड्युटी करायचे अशी त्यांची ख्याती आहे. त्यांना 'सिंघम' नावानेही ओळख मिळाली. तर 'खुपते तिथे गुप्ते' च्या (Khupte Tithe Gupte) आगामी एपिसोडमध्ये समीर वानखेडे येणार आहेत. अंडरवर्ल्ड, ड्रग्स अशा अनेक विषयांवर ते संवाद साधणार आहेत.
'खुपते तिथे गुप्ते' च्या पुढील एपिसोडचे प्रोमो रिलीज झालेत. यामध्ये समीर वानखेडे यांनी त्यांच्या स्टाईलने कार्यक्रमात रंजक आणली आहे.सेलिब्रिटींना विमानतळावर सर्वात जास्त भीती वाटायची ती समीर वानखेडे या नावाची. लोक म्हणायचे की वानखेडे मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त तपासणी करायला लावतात? असा प्रश्न अवधूतने विचारला. तर यावर समीर वानखेडे म्हणाले, 'माझ्यासाठी सेलिब्रिटी म्हणजे सिंधूताई सपकाळ, बाबा आमटे आणि एपीजे अब्दुल कलाम. विमानतळावर असताना जवळपास साडेतीन हजार केसेस आल्या. तुमच्या भाषेत सेलिब्रिटी जे आहेत ते किती असतील ५०-१००-१५०. बाकीचे लोक कोण आहेत? बाकीचे लोक ड्रग पेडलर्स, गंभीर गुन्हे करणारे त्यांच्याबद्दल कुणी काही बोलत नाही.'
समीर वानखेडे यांच्या या मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडेंनी शाहरुखच्या मुलाला आणि त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे काहीप्रमाणात ड्रग्स आढल्याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली. दोन महिने आर्यन खान तुरुंगात होता. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेच सीबीआयच्या चौकशी फेऱ्यात अडकले आहेत. ड्रग्स प्रकरणात शाहरुखकडून लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.