आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहेत. अलिकडेच त्यांनी अवधूत गुप्तेच्या खुप्ते तिथे गुप्ते या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. विशेष म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा देणाऱ्या समीर वानखेडे यांना रोजच शिक्षा मिळते, असं त्यांनी मजेशीर अंदाजात या कार्यक्रमात सांगितलं.समीर वानखेडे यांना या कार्यक्रमात अवधूतने क्रांतीविषयी काही प्रश्न विचारले. यात 'संकटाच्या काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी अनुरुप जोडीदार तुम्हाला क्रांतीच्या रुपात मिळाली.पण, कधी मित्रांसोबत असताना किंवा पार्टीतून घरी यायला उशीर झाला तर तुमच्यावर होम मिनिस्टर चौकशी बसवतात का? आणि, दोषी ठरलात तर काय शिक्षा मिळते?, असा प्रश्न अवधूतने विचारला. त्यावर समीर वानखेडे यांनी मजेशीर उत्तर दिलं.
काय म्हणाले समीर वानखेडे?
"मी पार्टी करत नाही. माझे फक्त दोन-तीन मित्र आहेत. पण मी त्यांच्यासोबतही सहसा कुठे जास्त जात नाही. मी अनेकदा घरी उशीरा येतो. कधी-कधी येत सुद्धा नाही. पण, ज्यावेळी हातात केस असते तेव्हाच असं घडतं. मात्र, क्रांती फार समजुतदार आहे. ती कधीच आरडाओरड करत नाही. रागवत नाही. त्यामुळे याबाबतीत मी खूप भाग्यवान आहे." असं समीर वानखेडे म्हणाले.
दरम्यान, समीर आणि क्रांती यांचं लव्ह मॅरेज आहे. १७ वर्षांपासून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर एकमेकांना डेट केल्यावराा त्यांनी लग्नगाठ बांधली. २०१८ मध्ये क्रांतीने झिया आणि झायदा दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.