Join us  

Bigg Boss OTT 3 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सना मकबूलचा बॉयफ्रेंड झाला खूश, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 11:24 AM

Bigg Boss OTT 3 : कोण आहे सनाचा बॉयफ्रेंड?

बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) चा काल ग्रँड फिनाले पार पडला. सना मकबूलने (Sana Makbul) ट्रॉफी आपल्या नावावर केली. तर रॅपर नॅजी रनर अप ठरला. सनाला प्रेक्षकांनी सर्वात जास्त वोट दिले ज्यामुळे ती विजयी झाली. सनाची आई आणि बहीण देखील स्टेजवर आल्या. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या सगळ्यात तिथे सनाचा बॉयफ्रेंडही होता जो तिला पाठिंबा देण्यासाठी आला होता. कोण आहे सनाचा बॉयफ्रेंड?

सना मकबूल लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये तिच्या स्वभावाने आणि एकंदर तिच्या खेळाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. याचंच फळ तिला मिळालं आणि ती ट्रॉफीची दावेदार ठरली. सना बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेड्डीला डेट करत आहे. सना जिंकल्यानंतर त्याची रिअॅक्शही समोर आली. त्याने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. जो व्हायरल होतोय. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. तर मागे सना बिग बॉसची ट्रॉफी हातात घेऊन उभी आहे. नंतर गाडीत बसल्यावर श्रीकांतने प्रतिक्रिया दिली. पुष्पगुच्छांनी सनाची गाडी भरलेली होती. श्रीकांत म्हणाला, "मला आज खूप आनंद होत आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतोय."

सना मकबूलला किती प्राईज मनी मिळालं?

बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेला स्टेजवर होस्ट अनिल कपूरने सना मकबूलचं नाव घेतलं आणि एकच जल्लोष झाला. सनाला चमकती ट्रॉफी आणि 25 लाख रुपये प्राईज मनी मिळाली. नंतर तिने तिचा बेस्ट फ्रेंड, बिग बॉसचा रनर अप नॅजीसोबत ट्रॉफी शेअर केली. तिच्या या कृतीने सर्वांचंच मन जिंकलं.

टॅग्स :बिग बॉससोशल मीडियाटिव्ही कलाकार