२०११ साली दिया और बाती हम मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले होते. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंग(Deepika Singh)ने संध्या आणि अभिनेता अनस रशीदने सूरज ही भूमिका साकारली होती. दीपिका आणि अनसची ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणाऱ्या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवले होते. त्यामुळे छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली होती. लग्नानंतर दीपिकाने टीव्हीपासून थोडा ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते.
२६ जुलै १९८९ रोजी दिल्लीत जन्मलेली दीपिका सिंगला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतच केले. त्यानंतर मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी ती पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीकडे वळली होती. दीपिकाने मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असले, तरी तिचे मन अभिनयाच्या दुनियेत रमले आणि तिने 'दिया और बाती हम' या टीव्ही मालिकेतून छोट्या पडद्याच्या दुनियेत पाऊल ठेवले. या मालिकेत संध्या कोठारीची भूमिका साकारल्यानंतर ती घराघरात प्रसिद्ध झाली. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे.
दीपिका सिंग अडकली होती वादाच्या भोवऱ्यातदिया और बाती हम या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दीपिका सिंगही वादात सापडली होती. खरेतर, एका इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान तिने सूरजची भूमिका साकारणाऱ्या अनस रशीदला थापड मारली होती. या घटनेनंतर दीपिकाने शो सोडण्याची धमकीही दिली होती. त्याचवेळी दीपिका आणि अनस रशीद यांच्यातील संभाषणही अनेक महिन्यांपासून बंद होते.