Join us

'सांग तू आहेस ना' फेम पूजा कातुर्डे झळकणार 'हृदयी प्रीत जागते’ मालिकेत, म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 5:00 PM

अहिल्याबाई होळकर, दुनियादारी फिल्मी स्टाईल, विठूमाऊली, श्री गुरुदेव दत्त या मालिकेत पूजानं काम केलंय.. सांग तू आहेस ना या मालिकेतील तिची निगेटीव्ह भूमिका चांगली गाजली होती..

अभिनेत्री पूजा कातुर्डेने एकांकिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. अनेक मराठी मालिकांमध्येही तिनं काम केलंय.  अहिल्याबाई होळकर, दुनियादारी फिल्मी स्टाईल, विठूमाऊली, श्री गुरुदेव दत्त या मालिकेत काम केलंय.. सांग तू आहेस ना या मालिकेतील तिची निगेटीव्ह भूमिका चांगली गाजली होती. लग्न मुबारक या सिनेमातही पूजानं काम केलं होतं. आता पूजा लवकरच झी मराठीवरील 'हृदयी प्रीत जागते’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

झी मराठी वाहिनीवर 'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका ७ नोव्हेंबर रात्री  ८ वा. प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   पूजा कातुर्डेची झी मराठी बरोबर ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना पूजा म्हणाली की, 'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका एक संगीतमय प्रेम कथा आहे त्यात वीणा ही अतिशय साधी मुलगी आहे आणि ती तिच्या बाबांची खूप लाडकी आहे. 

वीणा लहानपणापासून आईच्या प्रेमाला मुकलेय त्यामुळे बाबाच तिच्यासाठी सर्वस्व आहेत. वीणाचे वडील कीर्तनकार आहेत, तिला कीर्तनाची आवड आहे, कौटुंबिक संबंध मजबूत आणि एकजूट ठेवणे हे तिचे ध्येय आहे. या मालिकेत  वीणा आणि प्रभास ते दोघेही त्यांच्या स्वभावात, जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत, पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. वीणा कीर्तनकार आहे तर प्रभास रॉक बँड परफॉर्मर आहे. ते दोघेही संगीतासाठी वचनबद्ध आहेत. हे पात्र साकारण्यात मला खूप मज्जा येतेय आणि हि मालिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे कारण ती अतिशय अनोखी व्यक्तिरेखा साकारत आहे. या नव्या पात्रात प्रेक्षकांसमोर आल्याचा  मला खरोखर आनंद आहे आणि मला खात्री आहे प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल.

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी