नुकतीच सुरु झालेली मन झालं बाजींद मालिकाही रसिकांच्या आवडीस पात्र ठरत आहे. मालिकेचे कथानक, कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे मालिकेन अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. मालिकेतले कलाकारही रसिकांच्या ओळखीचेच आहेत. त्यामुळे आपल्या आवडीच्या कलाकारांना नवीन भूमिकेत पाहणे रसिकांसाठी उत्सुकतेचंं ठरत आहे. मालिकेच्या प्रोमो प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच मालिका पाहण्याची रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
'मन झालं बाजिंद' या मालिका सुरु होण्याआधीच पासून चर्चा रंगली होती. मालिकेचे भन्नाट प्रोमोज आणि त्यातील रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच बॅकग्राउंड म्युजिक देखील खूप आवडलं होतं त्यामुळे मालिका सुरु झाल्यापासून रसिकही मालिकेला खिळून आहेत. अभिनेत्री श्वेता राजन हि या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय.इतरही कलाकारांनी आपल्या भूमिकांनी रसिकांचे लक्षवेधून घेत आहेत. याच मालिकेतल्या कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यातही रसिकांना नक्कीच उत्सुकता असणार आहे.
'मन झालं बाजींद' या मालिकेत रायासोबत लग्न करण्यासाठी एव्हरेडी असणारी अंतराच्या भूमिकेनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सानिका काशीकरने ही भूमिका साकारली आहे. सानिका मॉडेलिंगदेखील करते. तसेच मालिकाच नाहीतर जाहिरातीमध्येही ती झळकली आहे. या मालिकेआधी ‘पाहिले न मी तुला’ ‘आनंदी हे जग सारे’, ‘वैजू नं 1’ या मालिकेतून सानिकाने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
सानिका उत्कृष्ट गायिकाही आहे. अभिनयात येण्यापूर्वी तिनं काही काळ इंटेरिअर डिझायनर कामही केले होते. हेजा कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर येथून इंटेरिअर डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. 'मन झालं बाजींद' या मालिकेत सानिका अंतराची विरोधी भूमिकारताना दिसत आहे.
सानिकाचे कुटुंब देखील संगीत क्षेत्राशी निगडित आहे. तिचे वडील ‘पंडित आनंद काशीकर’ हे उत्कृष्ट बासरीवादक म्हणूनओळखले जातात. तर ‘अद्वैत काशीकर’ हा देखील बासरीवादक आहे.
अद्वैतने त्याचे वडील पंडित आनंद काशीकर यांच्याकडूनच बासरीवादनाचे धडे गिरवले आहेत. दोघांनी एकत्र आपली स्टेज शोद्वारे कला सादर करत रसिकांची दाद मिळवली आहे.