Join us

संजय गांधीने 'उडान' मालिकेच्या भूमिकेसाठी केली 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:49 AM

भानु प्रताप सिंग हा एक व्यावसायिक आहे जो एक कारखाना सुरू करण्यासाठी आझादगंजमध्ये मजबूत पाय रोवण्याचा हेतू धरून आला आहे आणि तो स्वतःच्या स्वयंसेवी उद्देशाने प्रेरित आहे.

छोट्या पडद्यावरील दीर्घकालीन चालणारा शो उडान ने समाजाच्या बंधनातून मुक्त होण्याची भावना जिवंत करणाऱ्या तेजस्वी कथेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. स्वतःच्या लढाया स्वतः लढणाऱ्या आत्मविश्वाशी मुली पासून ते आई बनण्या पर्यंतचा चकोरचा प्रवास आणि न्यायासाठी तिने निर्धाराने दिलेला लढा यामुळे अनेकांच्या मनात घर करून बसला आहे.

रघू (विजयेंद्र कुमेरिया) सोबतचे तिच्या जीवनाचा नवीन अध्याय जेव्हा चकोर सुरू करते तेव्हाच एक नवीन वादळ तिच्यावर आणि आझादगंज वर येऊन धडकते, भानु प्रताप सिंगच्या रूपात, आणि ही भूमिका साकारत आहे निष्णात अभिनेता संजय गांधी.

भानु प्रताप सिंग हा एक व्यावसायिक आहे जो एक कारखाना सुरू करण्यासाठी आझादगंजमध्ये मजबूत पाय रोवण्याचा हेतू धरून आला आहे आणि तो स्वतःच्या स्वयंसेवी उद्देशाने प्रेरित आहे. भानु प्रताप एकीकडे खोटी आश्वासने देऊन लोकांना फसवत आहे तर रघु आणि चकोर त्याच्या योजनांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून तो शांत होईल. यामुळे अपमानित झालेल्या भानु प्रताप सिंग त्याचे केस काढून टाकून प्रतिज्ञा करतो की रघु आणि चकोरच्या जीवनात वादळ निर्माण करेल. एका नाट्यमय कलाटणी द्वारे या अभिनेत्याने ही भूमिका अचूक साकारण्यासाठी पडद्यावर टक्कल करण्याचे धाडसी पाऊल उचलले.

टक्कल करण्याच्या निर्णयाविषयी बोलताना संजय गांधी म्हणाले, टक्कल करणे किंवा नकारात्मक भूमिका साकारणे हे असे काही आहे ज्यात अभिनेता ही भूमिका स्विकारताना हजार वेळा विचार करतो. पण, मला विचार करण्याची गरज पडली नाही कारण मला दिल्या गेलेल्या पात्राच्या अंतरंगात मी शिरलो होतो. मी विचार केला की कृत्रिमतेचा वापर न करता खरे टक्कल केल्यामुळे हे पात्र जास्त अस्सल आणि नैसर्गिक दिसेल.”