Join us

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील ‘समीर’च्या खऱ्या आयुष्यातील मुलांचे फोटो पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 1:40 PM

‘माझी तुझी रेशीमगाठ”मालिकेत समीर ही भूमिका अभिनेता संकर्षण कर्‍हाडे (Sankarshan Karhade)ने साकारली आहे.संकर्षणचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ”ही मालिका रसिकांची आवडती मालिका बनली आहे.समीर ही भूमिका अभिनेता संकर्षण कर्‍हाडे (Sankarshan Karhade)ने साकारली आहे.संकर्षणचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तो फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. तसेच कुटुंबासह अनेकदा क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतानाचे फोटोही शेअर करत असतो. संकर्षणने त्याच्या मुलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  संकर्षणने आपल्या जुळ्या मुलांसोबतचा फोटो शेअर करत त्यांना सहा महिन्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वज्ञ’ आणि मुलाचे ‘स्रग्वी’ आज सहा महिन्यांचे झाले आहेत.  संकर्षणने शेअर केलेल्या  या फोटोमध्ये दोघांचा चेहरा जरी दिसत नसला तरी  संकर्षणच्या चेह-यावरचा आनंद मात्र स्पष्ट दिसतोय.

संकर्षणाच्या पत्नीने जुळ्या महिन्यात  मुलगा आणि मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. संकर्षण हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून उत्तम लेखक व कवीदेखील आहे. संकर्षणने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, रिअ‍ॅलिटी शो यांच्यामध्ये काम केलं आहे.

परभणीचं नाव मनोरंजन विश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे संकर्षण. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात 2008 ला तो दिसला होता. ‘माझीया प्रियाला’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये संकर्षणने काम केले आहे. झी मराठीवरील ‘रामराम महाराष्ट्र’चे सूत्रसंचालनही त्याने केलं. यासोबतच लोभ असावा, मी रेवती देशपांडे या लता नार्वेकर यांच्या व्यावसायिक नाटकात संकर्षण होता. संकर्षण त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे. त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच विचांर करायला भाग पाडतात. त्याच्या लेखनीची जादू त्याच्या एका पेक्षा एक अशा लयभारी कवितांमधून पाहायला मिळते.

टॅग्स :झी मराठीसेलिब्रिटी