Join us

"लोकमान्य टिळक जन्मस्थान आज मी पहिल्यांदाच पाहिलं...", संकर्षण कऱ्हाडेची 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 3:01 PM

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून नाव कमावणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.  नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. संकर्षण सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. त्याने एखादी पोस्ट शेअर केली रे केली की ती व्हायरल झालीच समजा. संकर्षणच्या नव्या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

संकर्षण मराठी नाटकांच्या प्रयोगादरम्यान विविध अनुभव येतात. ते संकर्षण चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असतो.  ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त संकर्षण सध्या रत्नागिरी दौरा करण्यात व्यस्त आहे. संकर्षणने सोशल मीडियावरुन दौऱ्याला जातानाचे काही खास फोटो शेअर करत “‘रत्नागिरी’ शहरांत आल्या आल्या दिवसाची सुरवात अशी झाली. लोकमान्य टिळक जन्मस्थान आज मी पहिल्यांदाच पाहिलं. किती छान वाटलं. मग शहरातली फेमस ‘मिसळ आंबोळी’ खाल्ली. वाह. मज्जा आली. आता आज रात्री १० वा. प्रयोग आहे, तो ही खणखणीत होणार” असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात 2008 ला तो दिसला होता. ‘माझीया प्रियाला’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये  संकर्षणने काम केले आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार