Join us

"तो क्या हुवा बेहेन", सान्या मल्होत्राने धर्मेशला पाहताच काढली सगळी भडास, तर नेटिझन्सनी केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 12:39 IST

Dharmesh & Sanya had earlier met on her audition in a show,धर्मेशला पाहतच सान्याने एका गोष्टीचा खुलासा केला. ६ वर्षाआधी सान्याने रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता.

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​एक अप्रतिम कलाकार असण्याबरोबरच उत्तम डान्सर आहे.दंगल या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली होती.सान्याने दंगल या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने फटाका, बधाई हो यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नुकताच तिचा 'पगलैट' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. आगामी काळात सान्याचे 'मिनाक्षी सुंदरेश्वर' आणि 'लव्ह होस्टेल' प्रदर्शित होणार आहेत.

 अभिनेत्री सान्या मल्होत्रा आज तिचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. नुकतीच सान्या मल्होत्रा डान्स दिवाना 3 शो मध्ये हजेरी लावली होती.यावेळी तिचा आगामी सिनेमाच्या प्रमोनसाठी ती आली होती. या शोला धर्मेश जज करत आहे. धर्मेशला पाहतच सान्याने एका गोष्टीचा खुलासा केला. ६ वर्षाआधी सान्याने रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता.त्यावेळी धर्मेशने तिला ऑडिशन मध्येच रिजेक्ट केले होते. ज्याने मला रिजेक्ट केले आज त्याच्या समोर मे माझ्या सिनेमाचे प्रमोशन करत आहे. 'आज माझ्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.  हे ऐकून धर्मेश आणि माधुरी दीक्षितही आश्चर्यचकीत झाले होते.

नॅशनल टीव्हीवर सान्या स्वतः चेच गोडवे गात होती. धर्मेश मात्र फक्त ऐकत होता. धर्मेशला नेमके काय बोलावे हेच कळत नव्हते. तितक्यात  जज तुषार कालियाने धर्मेशची बाजू घेत सान्याला सांगितले की, उलट धर्मेशचे तू आभार मानायला हवेत. त्यानंतर तू अधीक मेहनत केलीय. म्हणूनच आज  उत्तम कलाकार म्हणून स्वतः ला सिद्ध करू शकली.सर्वांसाठी प्रेरणा बनलीय.

टॅग्स :सान्या मल्होत्रा