'साराभाई वर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं आज निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे.
वैभवी उपाध्याय हे गुजराती थिएटर सर्किटमध्ये खूप लोकप्रिय नाव होतं. त्यामुळेच वैभवीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. रस्त्यावरुन वळण घेत असताना वैभवीची कार दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. कारमध्ये वैभवीचा होणारा नवरा देखील होता. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
५० फूट खाली गाडी कोसळली?
वैभवी काही काळ हिमाचल प्रदेशात होती. ती होणार नवरा जय सुरेश गांधीसोबत फिरायला गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी आणि जयसोबत फॉर्च्युनर कारमध्ये होती. दोघेही तीर्थक्षेत्र बंजार खोऱ्यात फिरायला जात होते. त्याचवेळी बंजारजवळील सिधवा येथे त्यांच्या कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि त्यानंतर कार रस्त्याच्या जवळपास ५० फूट खोल दरीत कोसळली. या कारचा फोटो सध्या समोर आला आहे.
'छपाक'मध्ये बाजवली भूमिका
वैभवीने २०२० साली दीपिका पादुकोणसोबत 'छपाक' आणि 'तिमिर' (२०२३) या सिनेमांमध्ये काम केलं होतं. अनेक गुजराती नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेसह 'क्या कसूर है अमला का' आणि 'प्लीज फाइंड अटॅच्ड' या सीरिजमध्ये काम केलं आहे.