Join us

​सरस्वती मालिकेत सरस्वतीसारख्या दिसणाऱ्या दुर्गाची होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 8:17 AM

सरस्वती मालिकेत सरस्वतीने देविकाला निव्वळ तिच्या मोठ्या मालकांसाठी स्वीकारले, मोठ्या मनाने तिला आपलसे केले, भैरवकरांच्या वाड्यामध्ये जागा दिली. राघव ...

सरस्वती मालिकेत सरस्वतीने देविकाला निव्वळ तिच्या मोठ्या मालकांसाठी स्वीकारले, मोठ्या मनाने तिला आपलसे केले, भैरवकरांच्या वाड्यामध्ये जागा दिली. राघव आणि देविकाचे लग्न होण्यामागे विद्युलचाच हात होता हे सरस्वतीला कळून सद्धा तिने संयम राखला. विद्युलच्या विरोधात तिने भैरवला काहीच सांगितले नाही. याच दरम्यान भैरवकरांचा वाडा आणि संपत्ती सरस्वतीच्या नावावर आहे हे विद्युलला कळाले आहे. संपत्ती मिळविण्यासाठी रचलेले कारस्थान सरस्वतीने जर राघवला सांगितले तर राघव आपल्याला या वाड्यामधून काढून टाकेल या भीतीने विद्युलने भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारण्याचे षड्यंत्र रचले आहे. दुर्देवाने हे दोघेही या कारस्थानामध्ये यशस्वी ठरले असून विद्युलने भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारून टाकले. सरस्वती मेल्यावर राघव काय करणार? वाडा आणि संपत्ती विद्युलला मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पुढील काळात मिळणार आहेत. तसेच सरस्वतीच्या जाण्याने मालिकेच्या कथानकाला एक वळण मिळणार आहे.विद्युलने सरस्वतीचा काटा काढून टाकला पण तिला मारल्यानंतर त्याला हे कळाले  आहे की, जोपर्यंत सरस्वतीचं प्रेत मिळत नाही, तो पर्यंत वाडा दुसऱ्या कुणाच्याही नावावर होऊ शकत नाही आणि जर हे प्रेत मिळाले नाही तर त्यांना सात वर्षं थांबावे लागेल. यामुळे विद्युलसमोर एक नवीन समस्या उभी राहली आहे तर दुसरीकडे सरस्वतीच्या अचानक जाण्याने राघव प्रचंड दुःखी झाला आहे. तो अचानक शांत झाला आहे, त्याचा कामामध्ये देखील रस उरलेला नाही. राघवच्या अशा वागण्याने देविका अस्वस्थ झाली आहे. गावाच्या जवळच असलेल्या एका मंदिरामध्ये जाऊन राघवसाठी नवस बोलण्याची इच्छा देविकाने विद्युलला सांगितली असून त्यासाठी राघव आणि देविका वाड्यामधून निघाले देखील आहेत. पण तिथे गेल्यावर देविकाला एक आश्चर्याचा धक्का बसणारा आहे. सरस्वती सारखीच दिसणारी दुर्गा नावाची मुलगी तिला दिसणार आहे. तिला पाहून सरस्वती राघवच्या आयुष्यात परतणार याची तिला भीती वाटायला लागली आहे.दुर्गा गावामध्ये तिच्या अक्का सोबत बऱ्याच वर्षांपासून राहत असून तिचा आणि सरस्वतीशी काहीच संबंध नाहीये. तिने पहिल्यांदाच सरस्वती हे नाव देविकाच्या तोंडून ऐकले आहे. मालिकेमध्ये दुर्गाचा लूक सरस्वतीच्या लूक पेक्षा अगदीच वेगळा आहे. वेगळ्या प्रकारची साडी, गॉगल, आंबाडा, असा तिचा लुक असून ती रांगडी भाषेत बोलताना दिसणार आहे. ही दुर्गा बाईक देखील चालवत असून संपूर्ण गाव या दुर्गाला घाबरतं. ती अतिशय बिनधास्त स्वभावाची आहे. देविकाने विद्युलला या दुर्गाबद्दल सांगितल्यानंतर ती भुजंगला दुर्गाला वाड्यामध्ये घेऊन यायला सांगणार आहे. दुर्गा नक्की कोण आहे? दुर्गाच्या येण्याने वाड्यामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे पाहाणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.Also Read : ​सरस्वती फेम तितिक्षा तावडेला आहे 'हा' छंद