मैत्री एक असं नातं आहे जे कधी ही ठरवून जुळत नाही. जिथे विचार जुळतात मैत्री आपली आपणच तयार होते आणि जर अशी मैत्री तुमच्या कामाच्या जागी निर्माण झाली तर कमावरचा कठीण दिवस ही सहज निघून जातो. अशीच एक मैत्रीण श्वेता मेहेंदळेला मिळाली तितिक्षाच्या रूपात. आपल्या मैत्रीबद्दल बोलताना श्वेता म्हणाली. 'मी तितिक्षाला पहिल्यांदा 'सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या' सेट वर भेटली आणि पहिल्या भेटीतच आमचे विचार मॅच झाले.
पहिल्या टेकपासून आम्ही खूप सहजपणे सीन्स करायला लागलो. आमची केमिस्ट्री तुम्हाला स्क्रीनवर ही पाहायला मिळत असेल. माझं तितिक्षाबद्दल पहिल्या भेटीत थोडं वेगळं मत होतं मला वाटलं की ती खूप शांत आहे. पण जशी आमची मैत्री वाढली मला कळले की ती ही माझ्यासारखी मस्तीखोर आहे. सेटवर जर कधी तितिक्षा नाही आली किंवा तिचा लेट कॉल टाईम असेल तर मी आतुरतेने तिची वाट पाहत असते. आऊटडोअर शूटिंग असेल तर आम्ही ठरवून एकत्र जातो. आमची सेटवरची टोपण नावं अशी नाहीयेत अजून, पण मी तितिक्षाला 'टी' म्हणून हाक मारते आणि तितिक्षा मला इंदू म्हणते. आमची मैत्री निखळ आहे.
दरम्यान ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत आत्तापर्यंत तीन पेट्यांचा उलगडा झाला आहे. मात्र, या पेटीतील मजकुरावर सर्पलिपी लिहण्यात आली आहे. ही सर्पलिपी वाचण्यासाठी नेत्रा आणि अद्वैतला कोण मदत करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.