सातव्या मुलीची सातवी मुलगी हि मालिका सध्या उत्कांवर्धक वळणावर आली आहेत. रोज नवे ट्विस्ट या मालिकेत घडत असतात. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या स्त्रियांसाठी असलेले नियम नेत्राने मोडले आहेत. एके दिवशी नेत्राच्या नाकातून रक्त येऊ लागतं. आता कदाचित पुढील मृत्यू नेत्राचाच होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इंद्राणी नेत्राला सांगते की त्रिनयना देवी ग्रंथ वाचला तर काहीतरी मार्ग सापडेल. पण त्याचवेळी भालबा येऊन सांगतात, की त्रिनयना देवीचा ग्रंथ पुन्हा मंदिरात ठेवला तर नेत्राचा मृत्यूयोग कदाचित टळू शकतो. भालबा नेत्राला सूचना देतात की ग्रंथ मंदिरात ठेवण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक पानावर हळदीकुंकू लाव आणि देवीचा मंत्र म्हण.
भालबांनी सांगितल्याप्रमाणे नेत्रा ग्रंथाला हळदीकुंकू लावत असताना ग्रंथावर तिच्या डोळ्यातील अश्रू पडतात. आणि त्यातून पंचपिटिका हा शब्द उमटतो. मालिकेत लवकरच पंचपिटिका रहस्याचा पहिल्या पेटीचं रहस्य उलगडणार आहे.
येणाऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल नेत्रा आणि इंद्राणीला पंचपिटिका रहस्यातील पहिली पेटी सापडते, ती पेटी नेत्रा-इंद्राणी राजाध्यक्षांच्या घरी येऊन येतात. रूपाली ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करते. पण रुपालीला धक्का बसतो आणि ती पेटी उघडता येत नाही. अखेर नेत्रा आणि इंद्राणी त्रिनयना देवीचा ग्रंथ आणि ही पहिली पेटी त्रिनयना देवीच्याच मंदिरात ठेऊन येण्याचं ठरवतात. पण इंद्राणीचं रक्त लागून ती पेटी उघडते. आता ह्या पहिल्या पेटीत नक्की काय रहस्य दडलंय हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.